Join us

Flower Market : बाजारात फुलांची आवक घटली; कसे मिळाले दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 18:40 IST

Flower Market : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फुलांची व हारांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, सध्या अपेक्षित पाऊस नसल्यामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. (Flower Market)

Flower Market : आषाढी एकादशीनिमित्त बाजारपेठेत फुलांची व हारांची मागणी मोठी झाली असताना, पावसाअभावी आवक घटल्याने किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. मोगरा, निशिगंधा, गुलाब यांसह हारांचे दर तब्बल ५०० रुपयांनी वाढले आहेत.(Flower Market)

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फुलांची व हारांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, सध्या अपेक्षित पाऊस नसल्यामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे.(Flower Market)

बाजारात फुलांची आवक कमी झाली आहे.यात गुलाब, मोगरा, निशिगंधा यांसह हारांचे भावही चढे झाले आहेत. धार्मिक कार्यक्रम, आषाढी एकादशी व विविध समारंभ यामुळे फुलांची मागणी वाढली असली तरी आवक कमी झाल्याने दरात वाढ होताना दिसत आहे.  शेतकऱ्यांना अपेक्षित दर मात्र मिळत नसल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.(Flower Market)

मागणी जास्त; आवक कमी

सध्या नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतुर, धर्माबाद, उमरी येथून फुलांची आवक होत असते. मात्र, या भागांत पावसाअभावी उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात रोजच्या तुलनेत आवक घटली आहे.

फुलांचे दर (प्रति किलो)

फुलांचे नावदर (₹)
पेंडी गुलाब१८० ते २००
मोगरा८०० ते १०००
निशिगंधा२५० ते ३००
डच गुलाब (बंडल)१०० ते १५०
लोकल शेवंती८० ते १००

हारांचे दर

हारांचा प्रकारदर (₹)
पिवळे हार३० ते ४०
निशिगंधा-गुलाब हार२५० ते ३००

मोगऱ्याला सर्वाधिक भाव 

मोगऱ्याच्या दरात तब्बल ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच निशिगंधा १०० रुपयांनी, डच गुलाब ५० रुपयांनी, पेंडी गुलाब १०० रुपयांनी महागला आहे. हारांच्या किमतींमध्येही ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या पाऊस कमी झाल्याने फुल उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आवक घटली आहे आणि भाव वाढले आहेत. - करीम फुलारी, व्यापारी

हे ही वाचा सविस्तर : Onion Market : फुलंब्री बाजारात ७२५ क्विंटल कांद्याची उलाढाल वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रफुलशेतीफुलंबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड