Gahu Market : आज ०२ मे रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची २४ हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये जालना, नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आवक झाली.
आज शरबती गव्हाला नागपूर मार्केटमध्ये सरासरी ३ हजार ४२५ रुपये, पुणे मार्केटमध्ये ५ हजार ३०० रुपये, अकोला मार्केटमध्ये ३ हजार ३०० रुपये, तर सोलापूर मार्केटमध्ये ३ हजार ३९० रुपये असा दर मिळाला. दुसरीकडे पिवळ्या गव्हाला माजलगाव मार्केटमध्ये २ हजार ७७५ रुपये उमरखेड मार्केटमध्ये २४ रुपये दर मिळाला.
तसेच लोकल गव्हाला गेवराई मार्केटमध्ये २८७५ रुपये, मलकापूर मार्केटमध्ये २७०० रुपये, अमळनेर मार्केटमध्ये २४४१ रुपये, उमरेड मार्केटमध्ये २७०० रुपये, नागपूर मार्केटमध्ये २४१४ रुपये तर अमरावती मार्केटमध्ये २३०० रुपये दर मिळाला.
तसेच 2189 या गव्हाच्या वाणाला भंडारा मार्केटमध्ये २२८० रुपये, शेवगाव मार्केटमध्ये २४०० रुपये, वाशिम मार्केटमध्ये २२५० रुपये, लासलगाव निफाड मार्केटमध्ये २३८१ रुपये असा दर मिळाला.
सर्वसाधारण गव्हाला सिन्नर- हिवरगाव मार्केटमध्ये २३०० रुपये, राहुरी वांबोरी मार्केटमध्ये २२७५ रुपये, कारंजा मार्केटमध्ये २४५० रुपये, वैजापूर मार्केटमध्ये २४८० रुपये तर तुळजापूर मार्केटमध्ये २४०० रुपयांपर्यंत दर मिळाला.