अमरावती : 'सीसीआय'द्वारे कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यादरम्यान २ शनिवार, ३ रविवार व २ दिवस होळी व रंगपंचमी आल्याने प्रत्यक्षात १५ दिवस नव्हे, तर सात दिवसच कापसाची खरेदी होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील आठ हजारांवर कापूस उत्पादक शेतकरी कापूस विक्रीसाठी प्रतीक्षेत असताना दिलासाजनक बातमी समोर आली आहे. भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) होणारी कापूस खरेदी सध्या अंतिम टप्प्यात असली, तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याने केंद्र शासनाने कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेले ऑनलाइन स्लॉट आता पुन्हा सुरू झाले असून, शेतकऱ्यांच्या मोबाइलवर मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षात सोमवारला होळी व त्यानंतर रंगपंचमीची सुट्टी राहणार आहे. त्यामुळे मुदतवाढनंतरची खरेदी प्रत्यक्षात बुधवारपासून सुरू होईल व त्यानंतरही ७ व ८, तसेच १४ व १५ या दिवशी शनिवार व रविवार असल्याने केंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे मुदतवाढीपैकी निम्मे दिवस दिवस केंद्र बंद राहणार असल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही ३१ मार्चपर्यंत कापसाची खरेदी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सीसीआयद्वारा ग्रेड कमी करण्याची शक्यतासीसीआयद्वारा आता कापसाचा ग्रेड कमी करण्याची शक्यता आहे. कापसाची प्रतवारी व झडती कमी असल्याचे कारण गतवर्षी सांगण्यात आले होते. यंदाही हाच कित्ता गिरवण्याची शक्यता आले.
स्लॉट बुकिंग आणि मेसेज अपडेटकापूस विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वात मोठी चिंता 'स्लॉट'ची होती. अनेक केंद्रांवर सीसीआयने खरेदी थांबवल्याची चर्चा होती, काही काळ स्लॉट बुकिंग बंद होते. आता ही प्रक्रिया सुरळीत झाली असून, शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावर कापूस आणण्यासाठी तारखेसह मेसेज येत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे मेसेज अद्याप आले नाहीत, त्यांनी संबंधित बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन आहे.
शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षायंदा हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी 'सीसीआय'च्या केंद्रांकडे धाव घेतली होती. जिल्ह्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी झाली आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही २० ते २५ टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा आहे.
Web Summary : Cotton purchase deadline extended to March 15th, but holidays shorten actual buying days. Farmers await better prices, facing potential grade reductions. Slot booking resumes, farmers receive messages for sales.
Web Summary : कपास खरीद की समय सीमा 15 मार्च तक बढ़ाई गई, लेकिन छुट्टियों के कारण वास्तविक खरीद दिन कम हो गए। किसान बेहतर कीमतों का इंतजार कर रहे हैं, संभावित ग्रेड कटौती का सामना कर रहे हैं। स्लॉट बुकिंग फिर से शुरू, किसानों को बिक्री के लिए संदेश मिल रहे हैं।