Kapus Bajarbhav : हंगामाच्या प्रारंभी कापसाला खासगीत ७२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता, तर शासकीय हमीभावही ८ हजार रुपयांच्या आसपास होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावेळीच विक्री करून मोकळे होणे पसंत केले. दरम्यान, कापूस महामंडळाने खरेदी बंद केल्यानंतर खाजगी बाजारात खरेदी सुरू राहिली.
सध्या दरात झालेल्या वाढीमुळे कापूस प्रतिक्विंटल ८,६५० रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कापूस उपलब्ध नसल्याने वाढीव दराचा फायदा त्यांना मिळू शकलेला नाही.
दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असली, तरी योग्य वेळी दर न मिळाल्याने अनेक शेतकरी वाढीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे दर वाढले; पण फायदा नाही, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
सात लाख क्विंटल कापसाची खरेदीजिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापूस खरेदीचे प्रमाण मोठे राहिले. मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक ४ लाख क्विंटल खरेदी झाली असून सेलू येथे २ लाख क्विंटल, तर परभणी बाजार समितीत १ लाख ५२ हजार १९५ क्विंटल खरेदीची नोंद झाली आहे. इतर बाजार समित्यांमध्ये खरेदीचे प्रमाण एक लाख क्विंटलच्या आतच राहिले.
वाचा आजचे बाजारभाव
Web Summary : Cotton prices surged to ₹8,650/quintal, but many farmers missed out due to earlier sales at lower rates. Market committees saw high volumes, with Manvat leading at 4 lakh quintals. Farmers express disappointment over not benefiting from the price hike.
Web Summary : कपास की कीमतें बढ़कर ₹8,650/क्विंटल हो गईं, लेकिन कई किसान पहले कम दरों पर बेचने के कारण चूक गए। बाजार समितियों में उच्च मात्रा देखी गई, जिसमें मानवत 4 लाख क्विंटल के साथ सबसे आगे है। किसान मूल्य वृद्धि से लाभ नहीं होने पर निराशा व्यक्त करते हैं।