Join us

Cotton Market : 'या' बाजारात दुपटीने वाढली पांढऱ्या सोन्याची आवक वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:47 IST

Cotton Market : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या आवक नेहमीच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक शेतकऱ्यांनी बाजारात कापूस विक्रीसाठी आणला आहे. वाचा सविस्तर (Cotton Market)

Cotton Market : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या आवक नेहमीच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक शेतकऱ्यांनी बाजारातकापूस विक्रीसाठी आणला असून, तरीही अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. (Cotton Market)

मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात २७ मे पर्यंत ६ लाख २६ हजार क्विंटल कापसाची आवक झाल्याची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी मे अखेरीस ३ लाख ५० हजार क्विंटल आवक आली होती. या तुलनेत यावर्षी मे अखेर दुप्पट कापसाची आवक झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे.(Cotton Market)

११ नोव्हेंबरपासून सुरु झाली होती कापूस खरेदी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात ११ नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली होती. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी मार्च महिन्यात कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस सीसीआयला हमीभावाने विक्री करण्याला पसंती दिली होती.

तर खासगी बाजार पेठेत भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांनी घरात कापूस ठेवण्यापेक्षा विक्री केलेला बरा अशी मानसिकता मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिसून आली होती.

मात्र या नंतर कापसाच्या बाजार भावात वाढ दिसून आली. १४ मार्च रोजी कापसाला ७ हजार ५२५ भाव मिळाला होता. या नंतर १७ मार्च रोजी कापसाच्या भावात २२५ रुपये वाढ होऊन ७ हजार ७६५ भाव मिळाला, २० मार्च रोजी ७हजार ८०० रुपये तर ३० मार्च रोजी ७ हजार ९०० रुपये भाव मिळाला.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कापसाने ८ हजाराचा पल्ला गाठला. या कालावधीत बाजार भाव आणखी वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवल्याने बाजारपेठेत आवक कमी झाली होती. मात्र शेतकऱ्यांची भाव वाढण्याची आशा फोल ठरली. परिणामी शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी काढल्याचे चित्र दिसून आले.

एप्रिल महिन्यात कापसाचे भाव ७ हजार ८०० ते ७ हजार ९०० रुपयांवर वर स्थिरावल्याचे चित्र दिसून आले. मे महिन्यात ही हीच स्थिती राहिल्याचे चित्र आहे. सीसीआय (CCI) आणि खासगी व्यापाऱ्याकडून एकूण ६ लाख २६ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे. मात्र अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी झाली आहे.  

तीन लाख क्विंटल कापूस सीसीआयला विक्री

बाजार पेठेत कापसाचे दर हमी भावापेक्षा तीनशे ते चारशे रुपये दर मिळत असल्याने शेतकरी सीसीआयला कापूस विक्री करण्यासाठी पसंती दिली. ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांनी तीन लाख पाच हजार क्विंटल कापूस सीसीआयला हमीभावाने विक्री केला असल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे.

टीन शेडमुळे कापूस लिलाव सुलभ

* कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने यार्डात दोन टीनशेड उभारल्यामुळे पावसातही लिलावाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र आहे.

* या तीन शेडमध्ये पाचशे वाहने उभी करण्यासाठी जागा असल्याने लिलाव प्रक्रियेत अडथळा येत नसल्याचे दिसून येत आहे.

जून अखेरपर्यंत कापूस येण्याची शक्यता

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे यार्ड परिसरात नोव्हेंबरपासून कापूस खरेदी-विक्री सुरू आहे. सहा लाख क्विंटलची नोंद झाली असली तरी आणखी जून अखेरपर्यंत शेतकरी आपला कापूस यार्डात विक्री करण्यासाठी आणण्याची शक्यता दिसून येत आहे.

१९ ते २६ मेपर्यंत मिळालेला भाव

दिनांक दर (प्रतिक्विंटल)
१९७,९०५
२१७,८७०
२३८,७६५
२६७,८५०

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market: कापसाच्या दरात सुधारणा; जाणून घ्या कसा मिळतोय दर

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती