Join us

Cotton Market : यंदा दिवाळीत कापसाला काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 18:23 IST

Cotton Market : एकीकडे कापूस वेचणी सुरू आहे. मात्र आवक कमी आहे. (Cotton Market In diwali 2024)

Cotton Market :  कापसाला अद्यापही समाधानकारक दर (Cotton rate) मिळत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे कापूस वेचणी सुरू आहे. मात्र आवक कमी आहे. यंदाच्या दिवाळीत कापसाला कमीत कमी 06 हजार 500 रुपयांपासून 07 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. किमान आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर आहे.

जर समजा दिवाळीचा (Diwali 2024) विचार केला तर साधारण 29 ऑक्टोबर रोजी कापसाला (cotton Market) कमीत कमी 06 हजार पाचशे रुपयांपासून 7 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला. यात मध्यम स्टेपल कापसाला हा सर्वाधिक 07 हजार 100 रुपयांचा दर मिळाला. तर 30 ऑक्टोबर रोजी कमीत कमी 06 हजार 500 रुपये आणि सरासरी 07 हजार रुपये असा दर मिळाला. 

तर 31 ऑक्टोबर रोजी देखील मागील दोन दिवसापूर्वीचाच बाजार भाव (Kapus Bajarbhav) मिळाला. तर 01 नोव्हेंबर रोजी वडवणी बाजारात सर्वसाधारण कापसाला 06 हजार 700 रुपये दर मिळाला. 02 नोव्हेंबर रोजी याच बाजारात 6700 दर मिळाला. तर आज 3 नोव्हेंबर रोजी समुद्रपूर बाजारात सर्वसाधारण कापसाला 07 हजार रुपयांचा दर मिळाला. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून कापसाचा हाच बाजारभाव असल्याचे चित्र आहे.

हमीभावापेक्षा कमीच दर 

एकीकडे यंदा केंद्र सरकारने मध्यम स्टेपल कापसाला 07 हजार 121 रुपये अशी किमान आधारभूत किंमत ठरवली आहे. तर लांब स्टेपलर कापसाला 07 हजार 521 रुपये अशी एमएसपी ठरवली आहे. मात्र बाजार समितीमध्ये या दोन्हीपैकी एकही हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :कापूसमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती