Join us

Cotton Market : कॉटन मार्केटचा मेकओव्हर; शेतकरी ते स्टार्टअप्स, सर्वांसाठी सुवर्णसंधी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:36 IST

Cotton Market : नागपूरच्या मध्यवर्ती कॉटन मार्केटचा चेहरामोहरा बदलणार आहे. पारंपरिक बाजारपेठेचा ऐतिहासिक ठसा जपतानाच आता इथे उभा राहत आहे. एक हायटेक व्यावसायिक हब तयार होणार आहे. (Cotton Market)

Cotton Market : नागपूरच्या मध्यवर्ती कॉटन मार्केटचा चेहरामोहरा बदलणार आहे. पारंपरिक बाजारपेठेचा ऐतिहासिक ठसा जपतानाच आता इथे उभा राहत आहे. एक हायटेक व्यावसायिक हब तयार होणार आहे. (Cotton Market)

महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSIDC) मार्फत राबविला जाणारा हा प्रकल्प आहे. शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांना संधी मिळणार आहे.(Cotton Market)

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं ऐतिहासिक कॉटन मार्केट आता केवळ पारंपरिक बाजारपेठ राहणार नसून, लवकरच ते नागपूरच्या व्यावसायिक प्रगतीचं आधुनिक प्रतीक ठरणार आहे. भव्य व्यावसायिक संकुलाची निर्मिती करत हा परिसर 'कमर्शियल हब' म्हणून विकसित केला जाणार आहे. (Cotton Market)

या प्रकल्पाची धुरा आता महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSIDC) कडे सुपूर्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना होणारे फायदे 

* विक्रीसाठी चांगले मार्केट उपलब्ध

* नव्या डिझाइनमुळे कॉटन मार्केट एक आधुनिक कमर्शियल हब बनेल.

* शेतकरी आपला शेतमाल थेट व्यापाऱ्यांना विकू शकतील.

* शेतमालाची मागणी वाढल्यास दरही चांगले मिळण्याची शक्यता.

भव्य व्यावसायिक संकुलाची निर्मिती

कॉटन मार्केट पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या नव्या इमारतीच्या डिझाइनमध्ये भव्य इमारतीची संकल्पना मांडण्यात आली आहे.

एका टॉवरमध्ये हॉटेल्स आणि सर्व्हिस अपार्टमेंट्स असतील

दुसऱ्या टॉवरमध्ये कॉर्पोरेट ऑफिसेस आणि व्यवसायासाठी जागा उपलब्ध असेल

तळमजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स, रिटेल शोरूम्स, फूड कोर्ट, बिझनेस लाउंज, स्मार्ट कॉन्फरन्स हॉल्स यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असतील

मल्टीलेव्हल पार्किंग आणि वाहतुकीसाठी स्वतंत्र लेन यामुळे लॉजिस्टिक सोई देखील दिल्या जातील

स्थानिक दुकानदारांचं पुनर्वसनही होणार

प्रकल्पात पूर्वीच्या व्यापाऱ्यांना विसरलं जाणार नाही. एकूण ८ हजार ७० चौरस मीटर क्षेत्रफळात असलेल्या कॉटन मार्केटच्या जागी आता ६० हजार ९४७ चौरस मीटरमध्ये नव्या इमारतीचं बांधकाम होणार आहे. यामध्ये १ हजार ५२० चौरस मीटरमध्ये स्थानिक दुकानदारांसाठी पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

एमएसआयडीसीच्या हाती महत्त्वाची जबाबदारी

पूर्वी ही जबाबदारी महामेट्रो कडे होती. जानेवारी २०१९ मध्ये मनपा आयुक्त अभिजीत बांगर आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्यात समन्वय करार झाला होता. 

आता या प्रकल्पास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता मिळाल्यानंतर, प्रत्यक्ष काम MSIDC कडे सोपवण्यात आले आहे.

एमएसआयडीसी सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, विधानभवन विस्तार, नेताजी मार्केट, दही बाजार, डिक हॉस्पिटल परिसर, इतवारी मार्केट, संत्रा मार्केट यांसारख्या प्रकल्पांचाही विकास करत आहे.

शहराच्या अर्थव्यवस्थेत नवचैतन्य

या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, स्थानिक व्यापारी, स्टार्टअप्स, लघुउद्योग, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान आधारित उद्योजक यांना नव्या संधी निर्माण होतील.

उत्कृष्ट पायाभूत सुविधा, हरित इमारतींची रचना आणि जागतिक दर्जाचे व्यावसायिक संकुल यामुळे नागपूरच्या मध्यवर्ती भागाला नवीन ओळख मिळणार आहे.

मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पास गती देण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, डॉ. बृजेश दीक्षित आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा सविस्तर : Sugarcane with AI : स्मार्ट सेंसर, स्मार्ट ऊस; 'या' कारखान्यात एआय प्रणालीने ऊस उत्पादन वाढवण्याचा निर्णय

टॅग्स :शेती क्षेत्रकॉटन मार्केटबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती