Join us
Daily Top 2Weekly Top 5

Cotton Market : कापूस बाजारात मोठा उलटफेर; तेजीला ब्रेक लागणार का? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:43 IST

Cotton Market : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक चित्र समोर आले आहे. महिनाभरापूर्वी प्रतिक्विंटल ८ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचलेले कापसाचे दर आता घसरत ७ हजार ४०० ते ७ हजार ५०० रुपयांवर आले आहेत. दरातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा विस्कळीत झाले असून बाजारातील अनिश्चिततेमुळे कापूस उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.(Cotton Market)

Cotton Market : महिनाभरापूर्वी कापसाच्या दरात झालेल्या तेजीमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.बाजारात प्रतिक्विंटल ८ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. (Cotton Market)

मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून दरात सातत्याने घसरण होत असून सध्या कापूस ७ हजार ४०० ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. दरातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पुन्हा विस्कळीत झाले आहे. (Cotton Market)

कापूस प्रमुख पीक

बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीननंतर कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. कोरडवाहू भागातील काही शेतकरी या पिकापासून दूर गेले असले, तरी सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

कापूस तुलनेने स्थिर उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, मागील काही वर्षांत उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांना नफा मिळवणे कठीण झाले आहे.

सीसीआय केंद्रामुळे मिळाला तात्पुरता दिलासा

बुलढाणा जिल्ह्यात सीसीआय (CCI) चे खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर काही काळ बाजारात तेजी पाहायला मिळाली होती.

हमीभावाच्या आधारावर खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र, ही तेजी फार काळ टिकली नाही. बाजारातील मागणी कमी झाल्याने दर पुन्हा घसरले आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.

हमीभावावर स्थिर दराची मागणी

कापसाला किमान हमीभावाच्या (MSP) पातळीवर स्थिर दर मिळावा, तसेच बाजारातील दरातील चढ-उतारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. सध्याच्या दरात उत्पादन खर्च वसूल करणेही कठीण होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

उत्पादन खर्चामुळे अडचणी

कपाशीच्या लागवडीसाठी बियाणे, खते, कीडनाशके, मजुरी आणि सिंचन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभावात घट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या स्थितीत असल्याचेही चित्र आहे.

शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल

दरवाढीच्या प्रतीक्षेत काही शेतकरी कापूस बाजारात विक्रीसाठी न आणता साठवून ठेवत आहेत.

मात्र, साठवणूक करण्यासाठी आवश्यक गोदाम सुविधा आणि भांडवल नसल्याने सर्वच शेतकऱ्यांना हा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कमी दरात कापूस विकावा लागत आहे.

पुढील काळातील दरांबाबत अनिश्चितता

सध्या सूतगिरण्यांकडून कापसाची मागणी मर्यादित आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीचाही स्थानिक बाजारभावावर परिणाम होत आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, पुढील काही आठवड्यांत सूतगिरण्यांची मागणी वाढल्यास दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.

सध्या सूतगिरण्यांकडून मागणी मर्यादित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीचा परिणाम स्थानिक दरांवर होत आहे. पुढील काही आठवड्यांत मागणी वाढल्यास दरात सुधारणा होऊ शकते.- विनोद बोंबटकार, व्यापारी, खेर्डा बु.

हे ही वाचा सविस्तर : Market Update : 'ट्रेड डील'चा फटका! कापूस, सोयाबीन, मक्याच्या दरात ७ ते १० टक्क्यांची घसरण वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton Market Reversal: Will the Bull Run End? Detailed Analysis

Web Summary : Cotton prices are falling after a month of gains, causing distress for farmers in Buldhana. Despite CCI interventions, prices remain unstable. Farmers seek stable prices at MSP levels due to rising production costs and uncertainty in the market.
टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती