Join us

Chilli Export : सिल्लोडची मिरची 'हॉट'; दुबईसह देशभरातून मागणी, दर झपाट्याने वाढले वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 11:14 IST

Chilli Export : हिरव्या मिरचीला देश-विदेशातून जोरदार मागणी निर्माण झाली आहे. मागील महिन्यात तब्बल ४ हजार रुपयांपर्यंत घसरलेले दर पुन्हा उसळी घेत ७ हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले आहेत. दुबईसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई आणि इतर राज्यांतून वाढलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.(Chilli Export)

श्यामकुमार पुरे

हिरव्या मिरचीला देश-विदेशातून जोरदार मागणी निर्माण झाली आहे. मागील महिन्यात तब्बल ४ हजार रुपयांपर्यंत घसरलेले दर पुन्हा उसळी घेत ७ हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले आहेत. (Chilli Export)

दुबईसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई आणि इतर राज्यांतून वाढलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.आगामी काळात बांगलादेशातूनही मागणी होण्याची शक्यता असल्यामुळे दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.(Chilli Export)

सिल्लोड तालुक्यात उत्पादित केल्या जाणाऱ्या तेजा फोर, तलवार, ज्वेलरी, आरमार या जातीच्या हिरव्या मिरचीलादुबईसह दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई, आदी भागातून मागणी वाढताच प्रती क्विंटलचा दर सात हजार पार गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.(Chilli Export)

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, आमठाणा, शिवना, पिंपळगाव, घाटनांद्रा व भोकरदन, जाफराबाद येथे परिसरात उत्पादित केलेल्या हिरव्या मिरचीचा बाजार भरतो. दररोज या बाजारात परिसरातील शेतकरी जवळपास १० हजार पोते हिरवी मिरची विक्रीसाठी आणतात.(Chilli Export)

एका पोत्यात ५८ किलो मिरची असते. अशी एकूण ५ लाख ८० हजार किलो मिरची दररोज विक्रीसाठी शेतकरी आणतात. या मिरचीच्या खरेदीसाठी राज्याच्या विविध भागातून व्यापारी येतात. (Chilli Export)

येथील मिरची दुबईसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आदी राज्यांत विक्रीसाठी जाते. १५ जूननंतर दुबईसह परराज्यातूनही मागणी नसल्याने दरात कमालीची घट झाली होती.(Chilli Export)

एरवी १२ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत विकली जाणारी हिरवी मिरची ३० जून रोजी चार हजारांवर आली होती. त्यामुळे मिरची लागवड, तोडणीचा खर्चही निघत नसल्याने उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाले होते. (Chilli Export)

त्यानंतर हळूहळू हिरव्या मिरचीची मागणी मुंबई, वाशी, ठाणे, नागपूर, पुणे, दुबईसह परराज्यातून अचानक वाढल्याने गेल्या चार दिवसांत ५ हजारांवरून ७ हजार ३०० पर्यंत दर गेला आहे. ७ जुलै रोजी मिरचीला ७ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.(Chilli Export)

एका पोत्यात किती मिरची?

५८ किलो मिरची एका पोत्यात असते. अशी एकूण ५ लाख ८० हजार किलो मिरची शेतकरी दररोज विक्रीसाठी आणतात.

परराज्यातील मिरचीचे उत्पादन घटल्याचा परिणाम

परराज्यातील मिरचीचे उत्पादन घटल्याने आपल्या हिरव्या मिरचीला मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल येथे मागणी वाढली आहे. यामुळे चार हजारांवर आलेली मिरची पुन्हा सात हजारांवर गेली आहे. शिवाय येत्या दोन दिवसांत बांगलादेशमध्येही आपली हिरवी मिरची जाऊ शकते. त्यानंतर भाव पुन्हा वाढू शकतात. -राजूबाबा काळे, व्यापारी, शिवना

गेल्या महिनाभरातील मिरचीचे दर (क्विंटलमागे)

मिरचीचे नाव१५ जून३० जून७ जुलै
पिकाडोर२,५००१,२००४,५००
बळीराम२,५००१,२००४,५००
तेजा - फोर१२,०००४,०००७,३००
शिमला१०,०००४,०००७,०००
तलवार१०,०००३,५००६,५००
ज्वेलरी१०,०००३,५००६,५००
आरमार१०,०००३,५००६,५००

हे ही वाचा सविस्तर : Banana Export : केळीचा गोडवा वाढला; युद्धविरामानंतर दरात दुपटीने वाढ वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमिरचीबाजारदुबईपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड