Chia Market : शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा असलेल्या चिया या औषधी पिकाच्या दरात मागील काही दिवसांत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. १४ जुलै रोजी चियाने २५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलचा उच्चांक गाठल्यानंतर दर कोसळत गेले.(Chia Market)
मात्र, ४ ऑगस्टला वाशिम बाजार समितीत पुन्हा २० हजार ४०० दर मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. दरातील या चढ-उतारामुळे चियाची आवकही कमी झाली असून शेतकरी बाजाराच्या स्थितीकडे उत्सुकतेने पाहत आहेत.(Chia Market)
एकेकाळी तब्बल २५हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर गाठणाऱ्या चिया या औषधी पिकाच्या दरात सध्या मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत दरात बऱ्याच प्रमाणात घट झाली असली, तरी सद्यस्थितीत पुन्हा किंचित वाढ दिसून येत आहे.(Chia Market)
जुलैमध्ये दर गगनाला भिडले
जुलैच्या मध्यात म्हणजे १४ जुलै रोजी चियाचे दर २५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात दरात मोठी घट झाली.
१९ जुलै रोजी चियाला वाशिम बाजार समितीत फक्त १९ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला.
आठवडाभरात ४ हजार ६०० रुपयांची घसरण!
या कालावधीत दरात थेट ४ हजार ६०० रुपयांची घट झाली, ज्याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर झाला. चांगल्या दराच्या अपेक्षेने जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात ६५० क्विंटलपर्यंतची आवक झाली होती. मात्र, दर घसरल्याने ४ ऑगस्ट रोजी केवळ ५५० क्विंटल आवकच झाली.
आता पुन्हा दरात सुधारणा?
४ ऑगस्ट रोजी वाशिम बाजार समितीत चियाला २० हजार ४०० रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला. म्हणजेच, मागील आठवड्याच्या तुलनेत किंचित सुधारणा झाली आहे. त्यामुळे चियाच्या दरात पुन्हा एकदा स्थिरता येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चिया लागवडीत वाढीची शक्यता
या हंगामात वाशिम जिल्ह्यात ३ हजार ६०८ हेक्टरवर चियाची लागवड झाली आहे. वाशिम आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून या पिकाची खरेदी होते. समाधानकारक बाजारपेठ आणि वाढता दर पाहता शेतकरी पुन्हा चियाकडे वळण्याची शक्यता आहे.
चियाचे कमाल दर
दिनांक | कमाल दर (रु./क्विंटल) |
---|---|
१४ जुलै | २५,५०० |
१९ जुलै | १९,९०० |
४ ऑगस्ट | २०,४०० |