Chia Kalonji Market Update : वाशिम जिल्ह्यातील शेतकरी सध्या पारंपरिक पिकांच्या तुलनेत नाविन्यपूर्ण पिकांकडे वळत असून, यामुळे त्यांच्या उत्पन्नात सकारात्मक बदल दिसून येत आहे. (Chia Kalonji Market Update)
विशेष म्हणजे, या सणासुदीच्या काळात चिया आणि कलंजी या पिकांच्या दरात सातत्याने तेजी सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत.(Chia Kalonji Market Update)
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी चियाला कमाल २४ हजार रुपये प्रतिक्विंटल, तर कलंजीला १७ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका उच्च दर मिळाला. (Chia Kalonji Market Update)
हा दर मागील काही महिन्यांतील सर्वाधिक असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकांकडे कल अधिक वाढला आहे.(Chia Kalonji Market Update)
नाविन्यपूर्ण पिकांकडे शेतकऱ्यांचा कल
पारंपरिक पिकांना बाजारात समाधानकारक दर न मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकरी नवनव्या पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. गेल्या हंगामात वाशिम जिल्ह्यात ३,६०८ हेक्टरवर चियाची लागवड झाली होती. या पिकाला उत्तम उत्पादन आणि चांगला बाजारभाव मिळाल्याने यंदा लागवड क्षेत्र आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.
कलंजीलाही गेल्या हंगामात काहीशा मर्यादित प्रमाणात लागवड झाली होती; परंतु आता तिच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
असे वाढत गेले चियाचे दर
| तारीख | दर (रु./क्विंटल) |
|---|---|
| २३ सप्टेंबर | २१,८०० |
| २९ सप्टेंबर | २२,७०० |
| ६ ऑक्टोबर | २४,००१ |
| १३ ऑक्टोबर | २४,००० |
असे वाढले कलंजीचे दर
| तारीख | दर (रु./क्विंटल) |
|---|---|
| ९ सप्टेंबर | १४,००० |
| १५ सप्टेंबर | १४,७०० |
| २३ सप्टेंबर | १७,००० |
| १३ ऑक्टोबर | १७,००० |
आवक आणि बाजारस्थिती
वाशिम बाजार समितीत ६ सप्टेंबर रोजी चियाची आवक २७५ क्विंटल होती, तर दरम्यान कमाल दर २४ हजार १ रुपये प्रतिक्विंटल इतका झाला. दरवाढीमुळे आवक थोडी वाढून १३ ऑक्टोबर रोजी २३५ क्विंटल झाली.
कलंजीच्या बाबतीत मात्र उलट चित्र दिसले. २९ सप्टेंबरला २५ क्विंटलवर असलेली आवक १४ क्विंटलपर्यंत घटली, कारण शेतकरी दरवाढीची अपेक्षा करत उत्पादन साठवून ठेवत आहेत.
पावसाचा फायदा
यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असल्याने सिंचनसाठे मुबलक झाले आहेत. बाजारात चिया आणि कलंजी यांना मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता, शेतकऱ्यांमध्ये या दोन्ही पिकांची लागवड वाढवण्याबाबत विचार करताना दिसत आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा
सध्या सोयाबीन, तूर आणि कपाशीला कमी दर मिळत असताना चिया आणि कलंजीसारख्या पिकांमुळे शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक दिलासा मिळत आहे.
बदलत्या हवामानात आणि बाजारपेठेतील स्पर्धेत ही दोन्ही पिके शेतकऱ्यांसाठी नवी आशा ठरत आहेत.
शेतकरी यंदा या पिकांच्या लागवडीकडे अधिक लक्ष देत आहेत आणि बाजारात या पिकांसाठी स्थिर मागणी असल्याने हंगाम उज्वल दिसत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soyabean Kadhani : सोयाबीन काढणीला वेग आला; पण हमीभाव केंद्रांचा पत्ता नाही!
Web Summary : Washim farmers find relief as chia and kalonji prices surge in the market. Chia reached ₹24,000/quintal, kalonji ₹17,000/quintal. Increased cultivation is expected due to good returns and ample water availability.
Web Summary : वाशिम के किसानों को चिया और कलौंजी की कीमतों में उछाल से राहत मिली। चिया ₹24,000/क्विंटल, कलौंजी ₹17,000/क्विंटल तक पहुंची। अच्छे रिटर्न और पर्याप्त पानी की उपलब्धता के कारण अधिक खेती की उम्मीद है।