Join us

Chara Bajarbhav : उन्हाळ्याची चाहूल, चाराही महागला, किती रुपयांनी भाव वाढले? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:37 IST

Chara Bajarbhav : एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नाहीत आणि त्यातच आता चाराही महाग (Fodder Market) होऊन बसला आहे.

नंदुरबार : शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय (Milk Business) सुरू केला आहे. परंतु उन्हाळा सुरू होताच चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नाहीत आणि त्यातच आता चाराही महाग होऊन बसला आहे. तेव्हा जनावरांचा सांभाळ कसा करावा? हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

शहादा तालुक्यातील काही गावांतील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे (Dudh Vyavsay) वळले आहेत. परंतु आजमितीस चारा महाग होऊन बसला आहे. २५ ते ३० रुपयास कडबा पेंडी बाजारात विक्री होत आहे. तसेच ढेप १९०० रुपये प्रती ६० किलोचे कट्टे मिळत आहे. चारा व ढेपेचे दर वाढताना दुधाचे दरही (Milk Rate) वाढणे अपेक्षित होते. परंतु दुधाचे दर कमी होत आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

दुसऱ्या गावातून चारा खरेदीजनावरे कसे जगवावे, अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. शेतकरी दुसऱ्या गावातून मिळेल त्या भावात चारा खरेदी करून आणत असल्याचे चित्र आहे. जनावरांना पोषक आहार म्हणून कडब्याला व हरभरा पिकाच्या कुटारला मागणी आहे. तसेच दिवसेंदिवस चाऱ्याचे भाव वाढत असल्याने त्या मानाने ट्रॅक्टर परवडत असल्याने बैल जोडी नको म्हणून जुने ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

ज्वारीचा पेरा कमीज्यांच्याकडे बैल जोडी, गायी, म्हशी, इतर जनावरे आहेत, असे शेतकरी जनावरांपुरता ज्वारी व हरभरा पिकांचा पेरा करतात. अनेक शेतकरी खुरपणी, काढणी, कडबा बांधणी या भानगडीत न पडता हरभरा, सोयाबीनची पेरणी करतात. त्यामुळे ज्वारीचा पेरा कमी झाल्याने यंदा कडबा भाव खात आहे.

सध्या चाराटंचाई निर्माण झाल्याने कडबाचे भाव वाढले आहे. आधी ७ ते ८ रुपये किलोप्रमाणे कडबा मिळत होता. परंतु सध्या १२ ते १३ रुपये किलोप्रमाणे विक्री होत असून जनावरांचा सांभाळ करायचा कसा असा प्रश्न पडतो.- अरुण दशरथ पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी, ता. शहादा.

चाऱ्याचे भाव हे पाचशे ते सातशे रुपयांनी वाढले आहेत. जादा पैसे मोजून सुद्धा चांगल्या दर्जाचा चारा मिळत नाही. कडबा तर मार्केटमध्ये पाहण्यास सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीमुळे पशुधन जगवण्याचे आव्हानच आमच्यासमोर उभे राहिले आहे.- प्रमोद शिवाजी पाटील, पशूपालक, ब्राह्मणपुरी, ता. शहादा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीचारा घोटाळाशेतकरी