Join us

Chana Market : हरभऱ्याच्या भावात जोरदार उसळी; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:51 IST

Chana Market : बिहार, दिल्ली, पश्चिम बंगालसह विविध राज्यांतून मागणी वाढल्याने जिल्ह्यातील बाजारात हरभऱ्याच्या दरात चांगली झेप घेतली आहे. मागील चार-पाच दिवसांपासून दर सातत्याने चढत असून सध्या प्रतिक्विंटल चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. या तेजीत शेतकरी समाधान व्यक्त करत असले तरी ग्राहकांना डाळ महाग होण्याची चाहूल लागली आहे.(Chana Market)

Chana Market : बिहार, दिल्ली, पश्चिम बंगालसह विविध राज्यांतून मागणी वाढल्याने जिल्ह्यातील बाजारात हरभऱ्याच्या दरात चांगली झेप घेतली आहे.मागील चार-पाच दिवसांपासून दर सातत्याने चढत असून सध्या प्रतिक्विंटल चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. (Chana Market)

या तेजीत शेतकरी समाधान व्यक्त करत असले तरी ग्राहकांना डाळ महाग होण्याची चाहूल लागली आहे. (Chana Market)

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मागील चार-पाच दिवसांपासून हरभऱ्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या प्रतिक्विंटल ५ हजार ९०० रुपये दर मिळत आहे. या दरवाढीमुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत, तर व्यापाऱ्यांनीही आशावादी दिसत आहे. (Chana Market)

मागणी वाढली, दर वाढले

बिहार, दिल्ली, पश्चिम बंगालसह विविध राज्यांतून हरभऱ्याच्या खरेदीला मागणी वाढल्यामुळे स्थानिक बाजारात दरात झपाट्याने सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारने हरभऱ्यावर २०२६ पर्यंत आयात शुल्क माफ केलेले असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात दर चढल्यामुळे देशांतर्गत बाजारही तेजीत राहिला आहे.

येत्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हरभरा डाळीची मागणी वाढल्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी आणि ग्राहकांवर परिणाम

दरवाढीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळत असल्याने ते खूश आहेत. मात्र, ग्राहकांना डाळीच्या किरकोळ दरात वाढीस समोरे जावे लागणार आहे. डाळ मिल मालकांसाठी कच्चा माल महाग झाल्याने उत्पादन खर्च वाढणार आहे, तर व्यापाऱ्यांसाठी चढ-उतारामुळे साठवणुकीचा धोका कायम आहे.

काय म्हणाले व्यापारी आणि शेतकरी?

हरभऱ्याला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागणी अजूनही वाढती आहे. दर काही काळ स्थिर राहतील, अशी अपेक्षा आहे. - गौरव चौधरी, व्यापारी.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दर समाधानकारक आहेत. मात्र, खर्च वाढल्याने उत्पन्न पुरेसे मिळावे यासाठी बाजारात स्थिरता आवश्यक आहे.- श्रीकृष्ण जाधव, शेतकरी.

दरवाढीमागची प्रमुख कारणे

* आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ

* सणासुदीमुळे डाळींची वाढती मागणी

* देशांतर्गत खरेदीत वाढ

* आयात शुल्क सवलतीचा मर्यादित परिणाम

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : लातूर बाजारात सोयाबीनचा दर स्थिरच; आवक किती वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती