Chana Market : मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील (Latur Chana Market) हरभऱ्याच्या मे मधील सरासरी किंमती पाहिल्या तर मे २०२२ मध्ये ४ हजार ४८० रुपये क्विंटल, मे २०२३ मध्ये ४ हजार ७८१ रुपये क्विंटल, मे २०२४ मध्ये ६ हजार २२१ रुपये क्विंटल भाव मिळाला. तर या मे २०२५ मध्ये ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर (Gram Market) मिळण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगाम (Rabbi Season) २०२४-२५ साठी हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत ५ हजार ६५० रुपये क्विंटल इतकी आहे. मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष एप्रिल २०२४-२५ (२८ एप्रिल २०२५ पर्यंत) मधील हरभऱ्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत जास्त झालेली दिसून येत आहे. एप्रिल २०२५ मध्ये ती ५.३ लाख टन इतकि आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ३.७ लाख टन इतकी होती.
हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे ११५.४० लाख टन होण्याची शक्यता आहे जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील २०२३-२४ मधील उत्पादन २६.९० लाख टनांवरून सन २०२४-२५ मध्ये २८.२ लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
हरभरा हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि उपभोग असणारे डाळवर्गीय पिक आहे. जागतिक पातळीवर एकूण डाळ उत्पादनापैकी २० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, पाकिस्तान आणि इथिओपियासह सहा देश जागतिक हरभरा उत्पादनात सुमारे ९० टक्के योगदान देतात. भारत हा हरभऱ्याचा प्रमुख उत्पादक देश असून जगातील एकूण उत्पादनात भारताचा वाटा सुमारे ७०-७५ टक्के आहे. भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. देशभरात हरभऱ्याचा वापर डाळ व बेसन या दोन्ही स्वरूपात केला जातो.
उत्पादन वाढण्याची शक्यता हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये हरभन्याचे उत्पादन सुमारे ११५.४० लाख टन होण्याची शक्यता आहे जे मागील वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील २०२३-२४ मधील उत्पादन २६.९० लाख टनांवरून सन २०२४-२५ मध्ये २८.२ लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर २०२४ पासून हरभऱ्याच्या किंमती कमी होत आहेत.