Join us
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारकडून 303 लाख मेट्रिक टन गहू खरेदीचे उद्दिष्ट, कधीपासून सरकारी दराने खरेदी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:35 IST

Gahu Kharedi : केंद्र सरकारने आगामी २०२६-२७ साठी ३०३ लाख मेट्रिक टन इतक्या गहू खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Gahu Kharedi :  केंद्र सरकारने आगामी २०२६-२७ साठी ३०३ लाख मेट्रिक टन इतक्या गहू खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. केंद्राच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने नवी दिल्ली येथे राज्य अन्न सचिव आणि एफसीआय अधिकाऱ्यांसोबत अन्नधान्य खरेदी, साठवणूक आणि सार्वजनिक वितरण प्रणालीच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

गहू काढणी हंगाम जोरात सुरु असून यंदाच्या सरकारी खरेदीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२५-२६ रब्बी हंगामात ३१२ लाख मेट्रिक टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यंदा यामध्ये घट दिसून येते आहे. मागील वर्षी जाब आणि हरियाणामधून २० दशलक्ष टन, तर उर्वरित ११ दशलक्ष टन अन्य राज्यांतून खरेदीचे लक्ष्य ठेवले होते. 

यंदा ३०३ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी होणार आहे. यामध्ये कुठल्या राज्यातील किती खरेदी होईल, आणि ही खरेदी कधीपासून चालू होईल, याबाबत अद्याप सांगण्यात आले नाही. मात्र येत्या दोन आठवड्यात ही खरेदी सुरु होण्याची शक्यता आहे. 

इतरही पिकांची खरेदी यावेळी २०२५-२६ (रब्बी पीक) चा भात खरेदीचा अंदाज तांदळाच्या बाबतीत ७६ एलएमटी निश्चित करण्यात आला आहे. २०२५-२६ (रब्बी पीक) दरम्यान राज्यांकडून बाजरी (श्री अण्णा) सह सुमारे ७.७९ एलएमटी भरड धान्य खरेदीचा अंदाज आहे. अंदाजे खरेदीसाठी ७.८३ लाख तागाच्या गाठी आणि ९.२२ लाख गाठी एचडीपीई पिशव्यांचे पुरेसे पॅकेजिंग साहित्य देखील वाटप करण्यात आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Government Targets 30.3 Million Tonnes Wheat Procurement; Procurement Start Soon

Web Summary : Central government aims to procure 30.3 million tonnes of wheat for 2026-27. This is a slight decrease from last year's target. Procurement details from individual states and exact start date are awaited, likely commencing in two weeks. Additionally, rice and millet procurement estimates were also discussed.
टॅग्स :गहूशेती क्षेत्रमार्केट यार्डकेंद्र सरकार