Wheat MSP Kharedi : रब्बी हंगामातील गहू काढणीचा हंगाम सुरु असून नव्या गव्हाची आवक बाजारात होते आहे. गहू मार्केटमध्ये सध्या सरासरी २२०० रुपयापासून ते २५०० रुपये ते २६०० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. तर दुसरीकडे काही राज्याकडून हमीभावाने गहू खरेदी केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यातच मध्य प्रदेश सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
रब्बी मार्केटिंग हंगाम २०२६-२७ साठी, मध्य प्रदेश सरकारने गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीवर (MSP) प्रति क्विंटल ४० रुपये बोनस जाहीर केला आहे. या निर्णयामुळे, शेतकऱ्यांना आता २ हजार ५८५ च्या MSP सह प्रति क्विंटल २ हजार ६२५ असा एकूण दर मिळणार आहे. ही योजना प्रामुख्याने मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी आहे, तर राजस्थानमध्ये गव्हावर १५० रुपये प्रति क्विंटल बोनस देण्याची शक्यता आहे.
गहू खरेदी बोनसचे महत्त्वाचे तपशील :
- मध्य प्रदेश : MSP २ हजार ५८५ रुपये, बोनस ४० रुपये, असा एकूण २ हजार ६२५ रुपये प्रति क्विंटल.
- राजस्थान : १५० प्रति क्विंटल बोनस (अंदाजित)
- उद्देश : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि सरकारी खरेदीमध्ये वाढ करणे.
- नोंदणी : गहू विक्रीसाठी नोंदणीची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.
- ही घोषणा मध्यप्रदेशातील (MP) मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.
मध्य प्रदेश सरकारने गहू खरेदी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. आगामी खरेदी हंगामात २,५८५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जाणार आहे. शिवाय MPS वर ४० रुपये प्रति क्विंटल बोनस सुद्धा दिला जाणार आहे. राज्याने गहू खरेदीसाठी नोंदणीची अंतिम मुदत देखील वाढवली आहे. जेणेकरून अधिकाधिक शेतकरी सहभागी होऊ शकतील आणि योजनेचा लाभ घेऊ शकतील.
Web Summary : Madhya Pradesh declared ₹40 bonus on wheat MSP, totaling ₹2625/quintal. Rajasthan may offer ₹150. Registration extended, benefiting farmers via increased income and procurement.
Web Summary : मध्य प्रदेश ने गेहूं एमएसपी पर ₹40 बोनस की घोषणा की, कुल ₹2625/क्विंटल। राजस्थान ₹150 दे सकता है। पंजीकरण बढ़ा, किसानों को आय और खरीद में लाभ।