Join us
Daily Top 2Weekly Top 5

Beed APMC Market : गुढीपाडव्यानंतर 'या' मोंढ्यात उसळी; गहू-ज्वारीची विक्रमी आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 16:15 IST

Beed APMC Market : गुढीपाडव्यानंतर बीडच्या मोंढ्यात शेतमालाची आवक झपाट्याने वाढली असून अवघ्या दोन दिवसांत १,३३९ क्विंटल माल बाजारात दाखल झाला. गहू आणि ज्वारीची विक्रमी आवक नोंदवली गेली, तर तूर आणि सोयाबीनच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.(Beed APMC Market)

बीड : गुढीपाडव्यानंतर बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवकेत मोठी वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. (Beed APMC Market)

येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात दोन दिवसांत एकूण १,३३९ क्विंटलहून अधिक शेतमालाची आवक झाली.(Beed APMC Market)

गहू आणि ज्वारीची आवक लक्षणीय वाढली असून तूर आणि सोयाबीनला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.(Beed APMC Market)

पहिल्या दिवशी मध्यम आवक

१९ मार्च रोजी बाजारात ६० शेतकऱ्यांनी ३६१ क्विंटल ५० किलो शेतमाल विक्रीसाठी आणला. गव्हाला किमान २,१५० ते कमाल २,६५२ रुपये दर मिळाला, तर ज्वारीला २,२५० ते ३,५९१ रुपये भाव मिळाला.

तुरीची आवक कमी असली तरी ७,१०० ते ७,६०० रुपये दर मिळाला. मुगाला ५,२२५ रुपये भाव मिळाला. हरभऱ्याची ५३ क्विंटल आवक झाली. या दिवशी एकूण व्यवहार सुमारे १२ लाख ३२ हजार रुपयांचा झाला.

दुसऱ्या दिवशी आवकेत झपाट्याने वाढ

गुढीपाडव्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २० मार्च रोजी बाजारात मोठ्या प्रमाणावर शेतमाल दाखल झाला. तब्बल ९७८ क्विंटल ५० किलो आवक नोंदली गेली. 

विशेष म्हणजे गव्हाची विक्रमी ५६४.५० क्विंटल आवक झाली. गव्हाला २,०५० ते २,६०१ रुपये दर मिळाला.

ज्वारीची ३६१.५० क्विंटल आवक झाली असून दर १,७३७ ते ४,९५१ रुपयांदरम्यान राहिला.

तूर व सोयाबीनला चांगला आधार

तुरीला ७,५०० ते ७,५३० रुपये दर मिळाला, तर सोयाबीनला सुमारे ५,४२५ रुपये भाव मिळाला. मागील दरांच्या तुलनेत क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हरभरा व सोयाबीन स्थिर

दोन दिवसांत हरभऱ्याची ६८ क्विंटल आवक झाली असून दर ४,८०० ते ५,०८० रुपयांदरम्यान राहिला. सोयाबीनची २७ क्विंटल आवक झाली असून दर ५,२९१ ते ५,४२५ रुपये मिळाला.

रेशीम कोषालाही प्रतिसाद

बाजार समितीच्या रेशीम कोष बाजारपेठेत २० मार्च रोजी ३४ लॉट (३,४१७ किलो) आवक झाली. यामध्ये किमान ३३० तर कमाल ७९० रुपये दर मिळाला. सरासरी दर ६७५ रुपये राहिला.

गुढीपाडव्यानंतर बाजारात शेतमालाची आवक वाढल्याने गहू आणि ज्वारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तूर आणि सोयाबीन दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असली तरी पुढील काळात आवक आणि दर यातील संतुलन कसे राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर :Harbhara Bajarbhav : हरभरा बाजारात मोठे चढ-उतार वाचा संपूर्ण अपडेट

अधिक वाचा : Hingoli Halad Project : हिंगोलीची हळद ठरतेय 'सोनं'; महिलांच्या हातून उभा राहतोय कोटींचा ब्रँड

English
हिंदी सारांश
Web Title : Beed APMC Market Sees Post-Gudi Padwa Surge; Record Wheat Arrival

Web Summary : Beed APMC market witnessed increased agricultural produce arrival post-Gudi Padwa. Wheat and sorghum saw record arrivals. Tur and soybean prices offered relief to farmers with satisfactory rates.
टॅग्स :शेती क्षेत्रगहूज्वारीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती