Join us

Banana Market : केळीच्या गणिताची घडी बसेना; काय आहे कारण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:28 IST

Banana Market : दसरा-दिवाळीच्या हंगामातसुद्धा केळीच्या दराने घसरण घेतली आहे. यावर्षी केवळ ५०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च वाढला, निर्यात ठप्प झाली आणि बाजारात मागणी घटल्याने केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत. (Banana Market)

Banana Market : दसरा व दिवाळीच्या सणासुदीच्या काळात साधारणपणे केळीला चांगली मागणी असते. मात्र, यावर्षी परिस्थिती उलटी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केळीला तब्बल हजार ते बाराशे रुपयांनी कमी दर मिळाल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. (Banana Market)

सध्या बाजारात केळीचा दर केवळ ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल आहे, तर गतवर्षी हाच दर १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपये होता.(Banana Market)

अतिवृष्टी, पूर आणि निर्यात ठप्प 

श्रावण ते दिवाळी दरम्यान केळीला धार्मिक आणि सणासुदीत विशेष मागणी असते. परंतु यावर्षी संपूर्ण देशभरातील अतिवृष्टी, पूर आणि वाहतुकीतील अडचणींमुळे उत्तर भारतातील मोठे बाजार (जम्मू, काश्मीर, पंजाब, दिल्ली) येथे केळी पोहोचवणे अवघड झाले. परिणामी, निर्यात थांबली आणि मागणी घटली. उत्पादन मात्र भरपूर असल्याने पुरवठा जास्त आणि मागणी कमी झाली, परिणामी दर कोसळले.

शेतकऱ्यांचे गणित कोसळले

एका एकरावर केळी उत्पादनासाठी किमान एक लाख रुपये खर्च येतो.

बियाणे, खते, मजुरी, सिंचन यावर मोठा खर्च

मजूर दररोज ४०० ते ५०० रुपये मजुरी घेतात

एका एकरात सुमारे ३० टन उत्पादन येते

तथापि, सध्याच्या दराने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नाही. अनेकांनी कर्ज घेऊन किंवा उसणे पैसे उधार घेऊन लागवड केली आहे. अपेक्षित दर न मिळाल्याने आता त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* बाजारातील स्थिती लक्षात घेऊन साठवणूक व प्रक्रिया केंद्रांचा वापर करा.

* निर्यातीसाठी संघटनात्मक प्रयत्न वाढवावेत.

* शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोल्ड स्टोरेज व मार्केटिंग नेटवर्क तयार केल्यास भविष्यात दरातील चढ-उताराचा फटका कमी होऊ शकतो.

* तसेच, केळी प्रक्रिया उद्योग (केळी चिप्स, केळी पावडर, इ.) सुरू करून उत्पादन मूल्य वाढवता येईल.

सणासुदीच्या काळात अपेक्षित दर न मिळाल्याने केळी उत्पादकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. शासन आणि कृषी विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन दरघटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे.

शासनाने मदत करावी

सध्या केळीला केवळ ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात दर १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपये असतात. यंदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदतीची घोषणा करावी.- सचिन कोरडे, राज्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघ

हे ही वाचा सविस्तर :  Soybean Success Story : अतिवृष्टीतही भरघोस उत्पादन; सागर घटारे यांच्या नियोजनबद्ध शेतीचं यश वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Banana Market Plunge: Farmers Face Losses Due to Price Drop

Web Summary : Banana farmers are distressed as prices plummeted due to oversupply and export disruptions. They're facing significant losses, unable to recover production costs. Farmers are urging government intervention and exploring processing options for better value.
टॅग्स :शेती क्षेत्रकेळीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीअकोला