Join us

Banana Export : कौठ्याची केळी पोहोचली इराणमध्ये; असा मिळतोय भाव जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:21 IST

Banana Export : कौठा तालुक्यातील शेतकरी आता आनंदी आहेत. आपल्या बागायती केळीला इराणमध्ये १ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढ परदेशी बाजाराकडे वाढला आहे. सिद्धेश्वर आणि इसापूर धरणांचे पुरेसे पाणी मिळाल्यामुळे बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेता येत आहेत. (Banana Export)

बालय्या स्वामी 

कौठा तालुक्यातील शेतकरी आता आनंदी आहेत. आपल्या बागायती केळीला इराणमध्ये १ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढ परदेशी बाजाराकडे वाढला आहे. सिद्धेश्वर आणि इसापूर धरणांचे पुरेसे पाणी मिळाल्यामुळे बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेता येत आहेत. (Banana Export)

वसमत तालुक्यातील कौठा आणि परिसरातील शेतकरी आता आपल्या बागायती पिकांमुळे आनंदी आहेत. 'पिकते तिथे विकत नाही' ही म्हण आता बदलत असून, कौठ्यातील केळीला इराणच्या बाजारपेठेत १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल एवढा आकर्षक भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गाने परदेशी बाजाराकडे आपला ओढ वाढवला आहे.(Banana Export)

पाण्यामुळे वाढला उत्साह

सिद्धेश्वर आणि इसापूर धरणांमधील मुबलक पाण्यामुळे कौठा तालुक्यातील शेतकऱ्यांना बागायती पिके घेण्यास मोठा लाभ मिळाला. 

मागील चार वर्षांपूर्वी पाण्याची कमतरता होती, मात्र आता कालव्याद्वारे पुरेसे पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी केळी, ऊस आणि हळद यांसारखी पिके लागवड करण्यावर भर दिला आहे.

शिवराम किशनराव देशमुख व जयराम देशमुख यांनी दीड एकरांमध्ये केळीची लागवड केली. या पिकांवर व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी होत आहे.

थेट विदेशी बाजारात विक्री

केळी थेट शेतात प्रक्रिया करून हवाबंद डब्यांमध्ये पॅक केली जाते आणि इराणमध्ये पाठवली जाते. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळतो आणि बाजारपेठेतील किंमती स्थिर राहतात.

बोरगाव, महमदपूरवाडी, पिंपराळा आदी शेतांमध्ये ऊस व हळदीबरोबर केळीची लागवड होत आहे. कौठा परिसर सिंचनाचा पट्टा म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे बागायती पिकांना पुरेसे पाणी मिळते.

कौठा परिसरातील शेतकरी आता आपल्या मेहनतीला योग्य बाजारभाव मिळवून, बागायती पिकांच्या व्यवसायात यश मिळवत आहेत. ही यशकथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : कोरफडीच्या पानातून यशाची फुले; दांडे परिवाराचा नवा यशस्वी मार्ग वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकेळीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती