Join us

Banana Export : केळीचा गोडवा वाढला; युद्धविरामानंतर दरात दुपटीने वाढ वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:02 IST

Banana Export : केळी उत्पादकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. खाडी देशांमध्ये युद्धविराम झाल्यामुळे निर्यात पुन्हा सुरू झाली असून केळीच्या दरात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. वादळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा हायसे वाटले आहे. (Banana Export)

Banana Export : केळी उत्पादकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. खाडी देशांमध्ये युद्धविराम झाल्यामुळे निर्यात पुन्हा सुरू झाली असून केळीच्या दरात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. वादळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा हायसे वाटले आहे.(Banana Export)

अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुललं आहे. खाडी देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे थांबलेली केळी निर्यात आता पुन्हा सुरू झाली असून केळीच्या दरात तब्बल दोनपट वाढ झाली आहे. (Banana Export)

मागील तीन आठवड्यांपूर्वी केळीला केवळ १ हजार १०० ते १ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता, तोच आता २ हजार ५०० ते २ हजार ५५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Banana Export)

अर्धापूरची ओळख 'केळी'

अर्धापूर तालुका केळी उत्पादनासाठी ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक कण्याचे मुख्य आधारस्तंभ म्हणजे केळी पीक. मात्र या वर्षी वादळी वाऱ्यांनी केळीची मोठ्या प्रमाणावर हानी केली होती. त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दरांची अपेक्षा होती.

खाडी युद्धाचा फटका

मात्र, इराण-इस्रायल या दोन देशांमधील युद्धामुळे गेल्या बारा दिवसांत केळी निर्यात पूर्णपणे थांबली होती. परिणामी, निर्यात होणाऱ्या केळीचे दर घसरले आणि शेतकऱ्यांना केळी कवडीमोल भावाने विकावी लागत होती. लाखो रुपये खर्च करून उभं केलेलं पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले होते.

युद्धविरामाचा फायदा

खाडी देशांत युद्धविराम झाल्यामुळे केळीची निर्यात पुन्हा सुरळीत झाली आहे. याचा थेट फायदा दरावर झाला असून निर्यात होणाऱ्या केळीचे दर २ हजार ५०० ते २ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. हीच केळी दिल्ली, हरयाणा, पंजाब, चंडीगड, श्रीनगर आदी भारतातील राज्यांमध्ये पाठवली जात आहे, तिथेही दर २ हजार ते २ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

तर स्थानिक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या केळीला १ हजार ७०० ते १ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

सध्याचे दर (प्रतिक्विंटल)

निर्यात केळी : २ हजार ५०० ते २ हजार ५५०

भारत देशांतर्गत (दिल्ली, पंजाब, हरयाणा इ.) : २ हजार ते २ हजार १००

स्थानिक बाजारपेठ : १ हजार ७०० ते १ हजार ९००

शेतकऱ्यांना समाधान

वादळ आणि बाजारातील घसरणीमुळे हताश झालेले शेतकरी आता समाधान व्यक्त करत आहेत. पिकातला गोडवा टिकून राहिला, पण दर गडगडले होते. आता दर चांगले मिळत असल्याने नुकसान काही प्रमाणात भरून निघेल, असं केळी उत्पादकांनी सांगितले.

हे ही वाचा सविस्तर : Banana Export : वसमतच्या केळीला परदेशात डिमांड; इराककडून विक्रमी दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकेळीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती