Join us

APMC Market : बाजार समित्या बंद; 'या' दिवशी पूर्ववत होणार बाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:33 IST

APMC Market : दिवाळीचा सण जवळ आला असताना जिल्ह्यातील शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडले आहेत. आठवडाभर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतमाल विक्री ठप्प झाली आहे. (APMC Market)

APMC Market : दिवाळीचा सण जवळ आला असताना जिल्ह्यातील शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडले आहेत. आठवडाभर कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतमाल विक्री ठप्प झाली आहे.(APMC Market)

हमीभावाने खरेदी अद्याप सुरू न झाल्याने आणि खासगी बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागत आहे. बाजार २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार असला तरी तोपर्यंत अनेकांच्या दिवाळीवर सावट पडले आहे.(APMC Market)

दिवाळीचा सण साजरा करण्याच्या तयारीत सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक संकटाचे ढग दाटले आहेत.(APMC Market)

कारण दिवाळीच्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विक्री थांबवावी लागत आहे. (APMC Market)

यंदा अतिवृष्टी, कीडरोग आणि अनियमित हवामानामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यातच बाजार समित्यांमध्ये हमीभावाने खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहेत.(APMC Market)

आता बाजार बंद झाल्याने खासगी बाजारात शेतमाल विकण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा पर्याय राहिलेला नाही.(APMC Market)

खासगी बाजारपेठेत सध्या सोयाबीनचा दर केवळ ३ हजार ते ३ हजार ५०० रु. प्रति क्विंटल इतकाच मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तोट्याने विक्री करावी लागत असून, त्यांची दिवाळी फीकी होण्याची शक्यता आहे.(APMC Market)

बाजार समित्यांचे व्यवहार २७ ऑक्टोबरपासून पूर्ववत सुरू होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

दिवाळीपेक्षा तोटा मोठा!

बाजार समित्या बंद असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहेत. दर कमी असल्याने अनेक शेतकरी सोयाबीन साठवून ठेवत आहेत. पण पावसामुळे शेतमाल ओलसर झाल्यास त्याचा दर्जा घसरून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी शेतमाल विकून दिवाळी साजरी करतो. पण यंदा बाजार बंद असल्याने सोयाबीन विक्री थांबली आहे. कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागते, तेही तोट्यात.- गौतम भगत, प्रगतशील शेतकरी, चिखली, रिसोड

नैसर्गिक आपत्तीने आधीच पिकांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी सरकारने हमीभावाने खरेदी सुरू करावी. तसे न करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.- हरीश चौधरी, पार्डीटकमोर, वाशिम

हे ही वाचा सविस्तर : Brinjal Market : पथ्रोटची हिरवी वांगी ओडिशा व छत्तीसगढात पोहोचली; शेतकऱ्यांना मिळाले लाखोंचे उत्पन्न

English
हिंदी सारांश
Web Title : APMC Markets Closed: Markets to Reopen on This Date

Web Summary : Diwali casts shadow as APMC markets shut for a week, impacting farmers. Hampered sales and low private rates force distressed soybean sales. Markets resume October 27th.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजार समिती वाशिमबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड