GI Lime Export : अपेडाने जीआय-टॅग (GI Tag Lime) असलेल्या इंडी लाईम (लिंबू) आणि पुलियांकुडी लाईमची पहिली हवाई शिपमेंट युनायटेड किंग्डमला सुरू केली. कर्नाटकातील विजयपुरा येथून एकूण ३५० किलो इंडी लाईम आणि तामिळनाडूहून १५० किलो पुलियांकुडी लाईम हवाई मार्गाने पाठवण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला, APEDA ने विजयपुरा, कर्नाटक येथून GI-टॅग असलेल्या स्वदेशी लाइमची तीन मेट्रिक टन यशस्वीरित्या संयुक्त अरब अमिराती मध्ये निर्यात केली.
उत्कृष्ट दर्जा, विशिष्ट चव, भौगोलिक वेगळेपणा, तिखट सुगंध आणि पूर्णपणे संतुलित आम्लतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या इंडी लाईमला पारंपारिक औषध आणि स्थानिक रीतिरिवाजांमध्ये मौल्यवान स्थान आहे. या उपक्रमामुळे, भारतातील जीआय-टॅग्ड कृषी उत्पादने जागतिक ग्राहकांमध्ये देशाच्या विविध उत्पादनांबद्दल जागरूकता निर्माण करतात आणि शेवटी आपल्या शेतकऱ्यांना फायदा होतो.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, हा दोन वेगवगेळ्या लिंबाच्या निर्यातीचा टप्पा शेतकऱ्यांना सक्षम करेल, नवीन बाजारपेठ मिळेल आणि जागतिक बाजारपेठेत भारताच्या कृषी उत्पादनांना मूल्य प्राप्त होईल. तसेच भारताची जीआय-टॅग्ड उत्पादने जागतिक स्तरावर आपली छाप पाडत आहेत. यासाठी अपेडाचे कौतुक, शिवाय आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि निर्यातदारांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत.
काय आहेत या दोन्ही लिंबाची वैशिष्ट्ये लिंबाच्या व्यतिरिक्त, कारगिलमधून घरवाली सफरचंद आणि जर्दाळूच्या निर्यातीला सौदी अरेबिया, कुवेत आणि कतारमध्ये नवीन बाजारपेठ मिळाली आहे. जिओग्राफिकल इंडिकेशन (GI) टॅग म्हणजे असे ठिकाणी जिथे उत्तम दर्जाचे एकमेव जातीचा शेतमाल तयार होतो.
स्वदेशी इंडी लाइमचे वैशिष्ट्य असे कि सुगंध आणि वेगळ्या चवसाठी ओळखला जातो, तर तामिळनाडूच्या पुलियांकुडीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते आणि पारंपारिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
Web Summary : APEDA facilitates the first GI-tagged lime export to the UK from Karnataka and Tamil Nadu. This boosts Indian agriculture and provides global recognition, benefiting farmers. The limes are known for unique taste and health benefits.
Web Summary : एपीडा ने कर्नाटक और तमिलनाडु से जीआई टैग वाले नींबू का पहला निर्यात यूके को किया। इससे भारतीय कृषि को बढ़ावा मिलेगा और किसानों को लाभ होगा। ये नींबू अपने अनूठे स्वाद और स्वास्थ्य लाभों के लिए जाने जाते हैं।