Join us

Amba Kharedi : आंबे खरेदी करताय? खरेदी करताना काेणती काळजी घ्यावी? वाचा सविस्तर 

By सुनील चरपे | Updated: May 5, 2025 11:54 IST

Amba Kharedi : बहुतांश ग्राहक चमकदार व आकर्षक दिसणारे आंबे खरेदी (Amba Kharedi) करण्यावर अधिक भर देतात. मात्र..

- सुनील चरपे

नागपूर : आंबा दिसला (Mango Season) की ताे खाण्याची कुणालाही इच्छा हाेते. बहुतांश ग्राहक चमकदार व आकर्षक दिसणारे आंबे खरेदी (Amba Kharedi) करण्यावर अधिक भर देतात. इथेच त्यांची गफलत हाेते. पक्व झालेले कच्चे आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बाेनेट तसेच इथिलीनचा माेठ्या प्रमाणावर वापर केला जाताे. या रसायनांनी पिकवलेले आंबे ओळखायचे कसे?

आंबे पिकण्यासाठी स्वत:मध्ये इथिलीन वायू तयार करतात व वातावरणात साेडतात. हा वायू खूपच हलका असल्याने लवकर उडताे. ताे उडून जाऊ नये, म्हणून पूर्वी आंबे झाडांची पाने, वाळलेले गवत अथवा कपड्यांनी झाकून ठेवले जायचे. हा वायू मानवी आराेग्यास अपायकारक नसल्याने सरकारने आंबे (Amba Market) पिकवण्यासाठी विशिष्ट प्रमाण व याेग्य पद्धतीने इथ्रेल व इथेफाॅन वापरण्याला परवानगी दिली आहे. याचा वापर रायपनिंग चेंबरमध्ये केला जाताे. याचे द्रावण आंब्यावर फवारणे घातक असते. ते रायपनिंग चेंबरमधील हवेत फवारावे लागते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डाॅ. भगवान कापसे यांनी दिली.

आंबे लवकर पिकवण्यासाठी व्यापारी कॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बाेनेटच्या पुड्या आंब्याच्या ढिगात ठेवतात. या दाेन्ही रसायनांपासून ॲसिटिलीन वायू तयार हाेताे. हा वायू ‘डी-ग्रीनिंग’ असल्याने फळांना २४ ते ३६ तासांत पिवळा रंग प्राप्त हाेताे, असेही डाॅ. भगवान कापसे यांनी सांगितले. हे रसायन ‘चायना पुडी’ नावाने बाजारात ओळखले जात असले, तरी त्याचा चीनसाेबत संबंध नाही. इथ्रेल किंवा इथेफाॅनच्या पुड्या आंब्यांमध्ये ठेवतात. त्या आंब्याच्या थेट संपर्कात येत असल्याने घातक ठरू शकते.

Mango Season : घरी आणलेले आंबे जास्त काळ साठवायचे असतील तर 'हे' करून पहा!

आर्सेनिकचे प्रमाण वाढण्याची शक्यताकाही व्यापारी कॅल्शियम कार्बाइडची पावडर आंब्यावर टाकतात. कॅल्शियम कार्बाइडमध्ये आर्सेनिक व फॉस्फरसचे घटक असतात. आंबे पिकवल्यावर ते फळात राहू शकतात. कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेल्या फळांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण वाढू शकते. आर्सेनिक विषारी असल्याने ते मानवी आराेग्यासाठी हानिकारक ठरते. कॅल्शियम कार्बाइडच्या धुरामुळे माणसांची दृष्टी जाण्याची शक्यता असते.

कॅल्शियम कार्बाइड किंवा कार्बाेनेटने पिकवलेले आंबेकॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बाेनेटने पिकवलेल्या आंब्यांची साल वरून चमकदार असते. सालीवर कुठलाही हिरवा डाग दिसत नाही. संपूर्ण साल एकसारखी पिवळीधम्मक दिसते. हे आंबे पाहिजे तसे नरम नसतात. त्यांचा सुगंध येत नाही. त्यांचा वास घेतल्यास नाकाला चुरचूर हाेते. तीन ते चार दिवसांत या आंब्यांवर काळे डाग पडतात.

काेणते आंबे खरेदी करावे?नैसर्गिकरीत्या किंवा इथ्रेल अथवा इथेफाॅनने याेग्य पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांचा सुगंध येताे. या आंब्यांची साल वरून एकसारखी पिवळी व चमकदार नसते. सालीवर छाेटे हिरवे ठिपके दिसतात व बारीक सुरकुत्या असतात. त्यांना चांगला नरमपणा असताे व ते डल दिसतात.

आंब्यांना घनता (ग्रॅव्हिटी) असते. एकपेक्षा जास्त घनता असल्यास ते पाण्यात बुडतात. एक किंवा एकपेक्षा कमी घनता असेल तर ते आंबे पाण्यावर तरंगतात. यावरून आंबे नेमके कशाने पिकवलेले आहेत, ते ओळखणे कठीण जाते.- डाॅ. भगवान कापसे, कृषी शास्त्रज्ञ

आम्ही आंबे पिकवण्यासाठी हळद व वेखंड वापरताे. एक लिटर पाण्यात प्रत्येकी पाच ग्रॅम हळद व वेखंड मिसळताे. त्या द्रावणात १० मिनिटे आंबे बुडवून बाहेर काढताे. ते न पुसता काेरडे झाल्यावर पिकायला ठेवताे. आठ ते दहा दिवसात आंबे पिकतात व चांगला गाेडवा येताे.- किशाेर सराेदे, आंबा उत्पादक, सिंधू फार्म, यवतमाळ

टॅग्स :आंबामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती