Join us

Wheat Crop : निम शासकीय आणि सहकारी संस्थांना गव्हाचे अतिरिक्त वाटप, कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 17:54 IST

म्हणून निम शासकीय आणि सहकारी संस्थांना गव्हाचे अतिरिक्त वाटप करण्यात आले आहे.

यंदा बाजारात गव्हाची आवक जेमतेम असून उत्पादन घटल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र गव्हाचे दरही समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा आहे. मात्र याच गव्हाच्या किमतींना आटोक्यात ठेवण्याच्या उद्देशाने निम शासकीय आणि सहकारी संस्थांना गव्हाचे अतिरिक्त वाटप करण्यात आले आहे. त्यांनतर सामान्य ग्राहकांना देखील विक्री केला  जाऊ शकतो. 

ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने  केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित सारख्या निम-शासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) द्वारे दिनांक 19.10.2023 च्या पत्राद्वारे गव्हाचे अतिरिक्त वाटप केले आहे. गहू/आट्याच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने वाटप केले असून वाटप केलेला गहू आट्यात रूपांतरित केला जाऊ शकतो आणि "भारत आटा" ब्रँड अंतर्गत सामान्य ग्राहकांना विकला जाऊ शकतो.

त्यानुसार, भारतीय अन्न महामंडळ 'भारत' ब्रँड अंतर्गत वितरणासाठी वर नमूद केलेल्या संस्थांनी केलेल्या मागणीनुसार योग्य पद्धतीनुसार स्टॉकची उपलब्धता सुनिश्चित करत आहे, या संस्थांनी  केलेल्या मागणीप्रमाणे आणि मंत्रालयाने जारी केलेल्या वाटपाअंतर्गत गव्हाचे काटेकोरपणे वितरण केले आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने त्यांच्या दिनांक 18.01.2024 च्या पत्राद्वारे, केंद्रीय भंडार/एनसीसीएफ/नाफेड/महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित सारख्या निम-शासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजारात विक्री योजनेद्वारे [(OMSS (D)] अंतर्गत “भारत तांदूळ/ भारत चावल” ब्रँड अंतर्गत सामान्य ग्राहकांना विक्री करण्यासाठी नॉन फोर्टिफाइड तांदळाचे अतिरिक्त वाटप केले होते. 

असे करण्यात आले वाटप 

तर मागील 22 एप्रिल 2024 पर्यंत, या संस्थांना 2 लाख 04 हजार 220 मेट्रिक टन गहू आणि 1 लाख 93 हजार 531 मेट्रिक टन वाटप करण्यात आले. तर  1 लाख 31 हजार 846 मेट्रिक टन गहू आणि 61 हजार 643 मेट्रिक टन तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडून उचलण्यात आले आहेत. सुरुवातीला या योजना 31 मार्च 2024 पर्यंत वैध होत्या. परंतु नंतर त्यांची मुदत 30 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळ संबंधित संस्थांना 1715 रुपये  प्रतिक्विंटल दराने गहू आणि 18.59 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देत आहे. त्यानंतर या संस्था सर्वसामान्य ग्राहकांना 5Kg/10 Kg च्या पॅकेजमध्ये 27.50 रुपये प्रति किलो या दराने  (आटा) आणि 29 रुपये प्रति किलो या दराने  (तांदूळ) अशी अन्नधान्याची विक्री करतील, असे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डगहूबाजारशेती क्षेत्र