Join us

Jaggery Market : शेतकऱ्यांसाठी गुळाचा गोडवा कायम; दरात अल्प वाढ वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 16:39 IST

Jaggery Market : मकरसंक्रांतीनिमित्ताने बाजारपेठेत गुळाची मागणी वाढली आहे. शहरातील बाजार समितीत दररोज सरासरी ३५० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. काय दर मिळतोय ते वाचा सविस्तर

लातूर : मकरसंक्रांतीनिमित्ताने बाजारपेठेत(Market) गुळाची मागणी वाढली आहे. शहरातील बाजार समितीत दररोज सरासरी ३५० क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

सध्या सर्वसाधारण दर ३ हजार ६०० रुपयांपर्यंत मिळत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दरात शंभर रुपयांची अल्पशी(slight) वाढ झाली आहे. त्यामुळे गूळ(Jaggery) उत्पादकांना आणि ग्राहकांनाही गुळाचा गोडवा मिळत आहे.

गुळाचा हंगाम हा साधारणतः नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत असतो. राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये(Market yard) लातूर आहे. येथील गुळाला विदर्भ, खान्देश, गुजरातमध्ये मोठी मागणी असते.

काही वर्षांपूर्वी येथील बाजार समितीत दररोज जवळपास २५ ते ३० हजार गुळाच्या डागांची आवक(Arrivals) होत होती. मात्र, काही वर्षांपासून गुळवे, कामगारांची कमतरता तसेच साखर कारखाने, गूळ पावडर कारखाने निर्माण झाल्याने जिल्ह्यातील गूळ उत्पादनावर संक्रांत आली आहे.

मात्र, जिल्ह्यातील काही शेतकरी आजही गुळाचे उत्पादन घेतात. ग्राहकांची मागणी(Demand) जाणून घेऊन त्या पद्धतीने शेतकरी गूळ निर्मिती करीत आहेत.

सर्वसाधारण दर ३६०० रुपये...

येथील बाजार समितीच्या माणिकराव सोनवणे गूळ मार्केटमध्ये दररोज जवळपास ३५० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. सध्या कमाल दर ४ हजार २०० रुपये, किमान भाव ३ हजार २०० रुपये, तर सर्वसाधारण दर ३ हजार ६०० रुपयांपर्यंत मिळत आहे.

महिनाभरापासून आवक सुरू...

महिनाभरापासून बाजार समितीत गुळाची आवक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दरात अल्पशी वाढ झाली आहे.मात्र, पूर्वीच्या तुलनेत ही आवक कमी आहे. शिवाय, मागणीही घटली आहे. साखर कारखान्यांमुळे गुहाळाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच मजुरांची कमतरता भासत असल्याने गूळ उत्पादनाकडील कल कमी झाला आहे. गुळापेक्षा सावर कारखान्यांचा अधिक भाव आहे. - ललितभाई शहा, माजी सभापती, बाजार समिती.

खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ बसेना...

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे कठीण झाले आहे. ऊस लागवड फायदेशीर ठरते, पण ऊस गाळपासाठीचा खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही. शिवाय, मजुरांची टंचाई व वाढती महागाईमुळे गुहाळ करणे अवघड झाले आहे. - अशोकराव माने, शेतकरी, हाळी.

दीडशे रुपयांची कमाल दरात वाढ...

वर्षकिमानकमालसाधारण
जानेवारी २०२५४२००३२००३६००
जानेवारी २०२४४०५०३११५३५२०
जानेवारी २०२३३५२५२५००३२५०
जानेवारी २०२२३०००२४८१२७३०

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : 'सीसीआय'च्या 'या' बाजारात ५८ दिवसांत खरेदी केला २ लाख क्विंटल कापूस

टॅग्स :शेती क्षेत्रऊसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड