अमरावती : शेतमालास हमीभावाचे संरक्षण (Guaranteed) मिळावे, यासाठी 'नाफेड'द्वारा (NAFED) शासनमान्य दराने खरेदी केल्या जाते. प्रत्यक्षात तुरीची (Tur) नोंदणी सुरू असताना अद्याप एकाही केंद्रावर खरेदी सुरू झालेली नाही तर हरभऱ्याच्या (Harbhara) शासन नोंदणीला अद्याप सुरुवातच नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे.
सद्यस्थितीत शिवारामध्ये तुरीचा हंगाम शेवटाला आला तर हरभऱ्याचा (Harbhara) सुरू झालेला आहे, असा परिस्थितीत आर्थिक अडचणीतील शेतकरी मिळेल त्या भावात शेतमालाची विक्री करीत आहे. दोनवेळा आलेल्या ढगाळ वातावरणाचा हरभऱ्याला फटका बसला व उतारा कमी आला.
यामध्ये त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तुरीच्या (Tur) शासन खरेदीसाठी मुदत संपली असताना २५ फेब्रुवारीला पुन्हा ३० दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे.
खरेदीचे आदेश असले तरी क्षेत्रनिश्चिती केलेली नसल्याने जिल्ह्यातील २० पैकी एकाही केंद्रांवर खरेदी सुरू झालेली नाही, हे वास्तव आहे. यावर्षी हंगामात सरासरीपेक्षा अधिक पावसाने तुरीचे मोठे नुकसान झाल्याने सरासरी उत्पादकतेमध्ये कमी आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बाजारभाव हमीभावापेक्षा कमी
* तुरीचा हमीभाव ७ हजार ५५० रुपये क्विंटल असताना बाजार समित्यांमध्ये ७,१०० ते ७,४०० रुपये क्विंटल भावाने विकल्या जात आहे.
* हरभऱ्याचा हमीभाव ५,६५० रुपये असताना ५,१०० ते ५,५०० रुपये क्विंटल दराने विकल्या जात असल्याने नुकसान होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Wheat Market: नव्या गव्हाची बाजारात आवक सुरु; जाणून घ्या सध्याचा क्विंटलचा भाव