Join us

Harbhara Market:दर वाढूनही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची का थांबविली विक्री; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:07 IST

Harbhara Market : यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,६५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तरीसुद्धा, शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री थांबविली आहे. जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर (Harbhara Market)

Harbhara Market : यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,६५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. तथापि, मागील काही महिन्यांमध्ये हरभऱ्याला कमी दर मिळत होता. आता, हरभऱ्याचे दर वाढले असून, बाजार समित्यांत काही ठिकाणी हरभऱ्याला त्यापेक्षा जास्त दर मिळत आहे. (Harbhara Market)

तरीसुद्धा, शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री थांबविली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक घटल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. बाजार समित्यांमध्ये नवा हरभरा दाखल होऊ लागला, त्यावेळी दरात घसरण सुरू झाली. (Harbhara Market)

केंद्र शासनाने ५,६५० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला असताना, व्यापाऱ्यांकडून ५,००० रुपये ते ५,२०० रुपये प्रतिक्विंटल दरानेच हरभऱ्याची खरेदी केली जात होती. त्यातच सोयाबीनचे दरही मोठ्या प्रमाणावर घसरले.(Harbhara Market)

शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामाच्या तयारीसाठी आणि इतर आर्थिक गरजांसाठी पैशांची आवश्यकता असल्याने, त्यांनी सोयाबीनऐवजी हरभऱ्याची विक्री केली. परिणामी, बाजार समित्यांत हरभऱ्याची आवक चांगली वाढली होती. (Harbhara Market)

हरभऱ्याचे क्षेत्र वाढले!

वाशिम जिल्ह्यात यंदा ७८,९३९ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली होती. उत्पादन समाधानकारक असल्याने पुढील काही दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर पुन्हा घसरू शकतात.

हमीपेक्षा अधिक दर

आता हरभऱ्याचा दर सहा हजारांच्या टप्प्यात आला आहे. म्हणजेच बाजार समित्यांत हरभऱ्याला हमीपेक्षा अधिक दर मिळत आहे. तथापि, या शेतमालाच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री थांबविली आहे. त्यामुळे बाजार समित्यांत हरभऱ्याची आवक कमी झाली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update: हमीभावाकडे झेपावणारा सोयाबीन दर गडगडला..! जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्रहरभरामूगबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड