Join us

Harbhara Market: नव्या हरभऱ्याला 'या' बाजारात इतका मिळाला दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:43 IST

Harbhara Market: कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) नवीन हरभऱ्याची (New Harbhara) आवक सुरू झाली आहे. त्याला कसा दर मिळतोय ते वाचा सविस्तर.

खामगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) नवीन हरभऱ्याची (New Harbhara) आवक सुरू झाली आहे. सद्य:स्थितीत हरभऱ्याला (Harbhara) ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. 

मुहूर्ताला ६ हजार २०० क्विंटलपर्यंत दर मिळाला होता; मात्र आता दरांमध्ये काही प्रमाणात घसरण पहावयास मिळत आहे. यावर्षी दर पूर्वीच्या तुलनेत थोडे अधिक असण्याची शक्यता होती; परंतु हरभऱ्याला मुहूर्तालाच चांगला दर मिळाला.

कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या हंगामात हरभऱ्याची गुणवत्ता उत्तम असली तरी, काही प्रमाणात हवामानाच्या बदलांमुळे उत्पादन घटले आहे. त्यात पिकांना चांगले दर मिळावे, अशी अपेक्षा आहे.

खामगाव तालुक्यातील बहुतांश भागात सध्या हरभरा काढणीला सुरुवात झालेली आहे. सोबतच इतरही ठिकाणचा माल या बाजार समितीत आणला जातो. त्यामुळे येत्या काही दिवसात हरभऱ्याची आवक आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अशी आहे आवक

यंदाही हरभऱ्याचे क्षेत्र वाढले असून, काही भागात हरभरा सोंगणीला आला असून, काही भागात सोंगणी सुरू आहे. सध्या आवक कमी असल्यामुळे भाव बऱ्यापैकी आहेत. आवक वाढल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हरभरा काढणी करताच विक्रीसाठी आणत आहेत.

आवक वाढणार, पण दरांचे काय?

खामगाव तालुक्यातील बहुतांश भागात हरभरा काढणीला आला आहे. हंगामात सुरुवातीला पेरणी झालेल्या हरभऱ्याची काढणी करून बाजारात आवक होत आहे. येत्या काही दिवसांत जवळपास हरभरा पिकाची सोंगणी करून काढणी होणार आहे. त्यामुळे बाजार समितीत आवक वाढेल; मात्र दरांच्या बाबतीत शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

तुरीचे दर स्थिर

गेल्या आठवड्यात सरासरी ७ हजार ४०० रुपयांचा भाव मिळालेली तूर (Tur) गुरुवार(१३ फेब्रुवारी) रोजी ७ हजार ४२५ रुपये क्विंटलने विक्री झाली, तर आवक ६ हजार क्विंटलची झाली होती. मागील वर्षी तुरीने ११ हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. भाव कायम राहतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती; मात्र भाव पडल्याने निराशा झाली आहे. दरम्यान, येणाऱ्या पंधरवड्यात तरी भाव स्थिरच राहण्याची शक्यता व्यापारी वर्तवीत आहेत.

मागील वर्षी तुरीने पल्ला गाठला : ११,००० रुपये

यावर्षी तुरीचा दर सरासरी : ७,४०० रुपये

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Market : नवा हरभरा बाजारात दाखल; प्रति क्विंटल असा मिळतोय भाव

टॅग्स :शेती क्षेत्रतुराहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड