Join us

Harbhara Bajar Bhav: हरभरा दरवाढीच्या प्रतीक्षेत घरातच वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 16:41 IST

Harbhara Bajar Bhav : अनुकूल हवामानामुळे यावर्षी हरभऱ्याचे उत्पादनही बऱ्यापैकी चांगले झाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खुल्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल किमान सहा हजार रुपये दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. (Harbhara Bajar Bhav)

समीर पडोळे

दोन महिन्यांपूर्वी खुल्या बाजारात हरभऱ्याच्या (Harbhara Bajar Bhav) दराने प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांची पातळी गाठली होती. तेच दर आता प्रतिक्विंटल सरासरी ९०० रुपयांनी उतरले असून, सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ५,१०० रुपये दर मिळत आहे. 

त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत हरभऱ्याची विक्री थांबविल्याने हरभरा त्यांच्या घरातच साठवून आहे. खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्याने भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पिकावर लक्ष्य केंद्रित केले होते. (Harbhara Bajar Bhav)

अनुकूल हवामानामुळे यावर्षी हरभऱ्याचे उत्पादनही बऱ्यापैकी चांगले झाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खुल्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल किमान सहा हजार रुपये दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. (Harbhara Bajar Bhav)

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पिकाच्या कापणी व मळणीला सुरुवात झाली आणि त्यापूर्वी हरभऱ्याचे दर खाली यायला लागले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सात महिन्यांपासून स्थिर असलेले हरभऱ्याचे दर शेतकऱ्यांकडील हरभरा बाजारात येताच उतरत असल्याचा आरोप वी कांढारकर, मिलिंद राऊत, रवी राऊत, विठ्ठल लेदाडे, सतीश पडोळे, प्रभाकर महाले यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केला आहे. (Harbhara Bajar Bhav)

सध्या खुल्या बाजारात मिळत असलेला दर आणि सरकारने जाहीर केलेली एमएसपी (MSP) यात उत्पादन खर्च भरून निघत नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.

नाफेडच्या खरेदीची बोंब

दर उतरल्याने शेतकरी कमी दरात हरभरा विकायला तयार नाही. दुसरीकडे, सरकारने नाफेडच्या माध्यमातून भिवापूर तालुक्यात हरभऱ्याच्या खरेदी व नोंदणीला अद्याप सुरुवात केली नाही. सन २०२४-२५ च्या विपणन हंगामासाठी केंद्र सरकारने हरभऱ्याची एमएसपी ५,६५० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे. एमएसपी दराने हरभरा विकल्यास प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये अधिक मिळतील, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.

बाजार समितीद्वारे दिशाभूल

* भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फलकावर शेतमालाची रोजची आवक आणि दर लिहिले जातात. या फलकावर शेतमालाचा किमान व कमाल दर लिहिणे अपेक्षित असताना भिवापूर बाजार समिती केवळ कमाल दर नमूद करते.

* बाजार समितीत विकायला येणाऱ्या फार थोड्या शेतमालाला कमाल दर मिळतो. बहुतांश शेतमाल त्यापेक्षा कमी दराने खरेदी केला जातो. दराबाबतची ही माहिती दिशाभूल करणारी ठरते, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

* या फलकावर शेतमालाचे सरासरी दर नमूद करावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Limbu Bajar Bhav : लिंबाच्या दरात तेजी; बाजारात कसा मिळतोय भाव वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड