Join us

Harbhara Bajarbhav: हरभऱ्याच्या दरात सुधारणा; पण मिळतोय का हमीभाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:47 IST

Harbhara Bajar bhav : मागील काही दिवसांपूर्वी बाजार समित्यांत घसरलेले हरभऱ्याचे दर आता सुधारत आहेत. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात सुधारणा होत आहे. वाचा सविस्तर. (Harbhara Bajar bhav)

Harbhara Bajar bhav : मागील काही दिवसांपूर्वी बाजार समित्यांत घसरलेले हरभऱ्याचे दर आता सुधारत आहेत. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात सुधारणा होत असल्याचे दिसत असले, तरी हमीभावापेक्षा अद्यापही कमीच असल्याचे दिसत आहे. (Harbhara Bajar bhav)

दरात सुधारणा झाल्याने खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने २०२५-२६ या वर्षासाठी हरभऱ्याला ५ हजार ६५० रुपये प्रती क्विंटलचा हमीदर घोषित केला आहे. (Harbhara Bajar bhav)

यंदाचा हरभरा बाजारात दाखल होऊ लागल्यानंतर मात्र बाजार समित्यांत या शेतमालाच्या (Shetmal) दरात घसरण सुरू झाली होती. आधी सोयाबीन, तूर आणि नंतर हरभऱ्याच्या दरातही घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते.

बाजार समित्यांमध्ये दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांनी विक्री रोखली होती. परिणामी, बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवकही कमी झाली होती. आता मागील चार ते पाच दिवसांपासून हरभऱ्याच्या दरात हळूहळू सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सद्यः स्थितीत बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सरासरी कमाल ५ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. (Harbhara Bajar bhav)

आवक वाढणार!

वाशिम जिल्ह्यात यंदा ७८ हजार ९३९ हेक्टर. वर हरभऱ्याची पेरणी झाली होती. अपवाद वगळता उत्पादनही समाधानकारक झाले. आता शेतकरी खरिपाची तयारी करीत असल्याने पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतमालाची विक्री करीत आहेत. त्यातच हरभऱ्याच्या दरात सुधारणा होत असल्याने त्यांचा हरभरा विक्रीवर भर आहे. त्यामुळे बाजार समित्यात या शेतमालाची आवक पुढे वाढण्याची शक्यता आहे.

वाशिममध्ये मिळाला ६,५३५ रुपयांचा दर !

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात काहिशी सुधारणा झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामध्ये सर्वाधिक दर वाशिम बाजार समितीत मिळत आहे. या बाजार समितीत शनिवारी हरभऱ्याला ५ हजार ६३५ रुपये प्रती क्विंटलपर्यंतचा दर मिळाला.

हरभऱ्याला कोठे किती दर

बाजारपेठदर (प्रति क्विंटल)
वाशिम५६३५
कारंजा५४००
रिसोड५६००
मानोरा५३३०
मंगरुळपीर५६२५

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Bajar Bhav: बाजारात कोणत्या हरभऱ्याला मिळतोय चढा दर ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहरभरामूगबाजारबाजार समिती वाशिममार्केट यार्डमार्केट यार्ड