Join us

Harbhara bajarbhav : हरभऱ्याची विक्रमी दोन लाख क्विंटल आवक; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 13:55 IST

Harbhara bajarbhav : जालना येथील बाजार समितीत यंदा हरभऱ्याची (Harbhara) विक्रमी दोन लाख २८ हजार ८८९ क्विंटल आवक झाली आहे. हरभऱ्याला सरासरी काय मिळाला ते वाचा सविस्तर.

Harbhara bajarbhav : जालना येथील बाजार समितीत यंदा हरभऱ्याची (Harbhara) विक्रमी दोन लाख २८ हजार ८८९ क्विंटल आवक झाली आहे. हरभऱ्याला सरासरी ५२७५ रुपयांचा दर मिळत आहे.

येथील बाजार समितीत हरभऱ्याची दैनंदिन सरासरी ८ ते १० क्विंटलची आवक होत आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

होणारी आवक पाहता, बाजार समितीकडून व्यापारी, शेतकऱ्यांसाठीही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील बाजार समितीत मागीलवर्षी हरभऱ्याची (Harbhara) ८७ हजार ९०२ क्विंटल आवक झाली होती. तर यंदा आजवर तब्बल २ लाख २८ हजार ८८९ क्विंटल आवक झाली आहे.

बाजार समितीत गावरान हरभऱ्याला (Harbhara) कमाल ५३७८, तर किमान ५१५० रुपयांचा दर मिळत आहे. सरासरी दर ५२७५ रुपये इतका आहे. हरभरा काबुलीला कमाल दर ७६०० रुपये आणि किमान दर ५८०० रुपये मिळत आहे.  

तर सरासरी दर ७२०० रुपये इतका आहे. हरभऱ्याची दैनंदिन ८ ते १० हजार क्विंटल आवक होत असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. २ लाख २८ हजार ८८९ क्विंटल हरभऱ्याची आतापर्यंत आवक झाली असून हरभऱ्याला सरासरी ५२७५ रुपयांचा दर मिळत आहे.

७२५० रुपयांवर गेले तुरीचे भाव

बाजार समितीत पांढऱ्या तुरीची सरासरी दोन हजार क्विंटल आवक होत असून, कमाल दर ७४०० रुपये व किमान दर ५६०० रुपये मिळत आहे. तर सरासरी दर ७२०० रुपये मिळत आहे. लाल तुरीची २०० क्विंटल आवक असून, कमाल दर ७२५० व किमान दर ६५०० रुपये आहे. तर सरासरी दर ७१०० रुपये मिळत आहे.

सोयाबीनला ३९०० रुपयांचा दर

सध्या बाजार समितीत सोयाबीनची सरासरी दोन हजार क्विंटल आवक होत आहे. त्यात कमाल दर ४००० रुपये, तर किमान दर ३३०० रुपये असून, सरासरी दर ३९०० रुपये दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

यंदा हरभऱ्याची विक्रमी आवक झाली आहे. आजवर दोन लाख क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. मुख्य प्रशासक आ. अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. - मोहन राठोड, सचिव, बाजार समिती

असे आहेत शेतमालाचे दर

गहू  २६५०
ज्वारी २४००
बाजरी २८००
मका १८५०
सोयाबीन ३९००
तूर पांढरी ७२००
मोसंबी १३००

हे ही वाचा सविस्तर : Harbhara Bajar Bhav : अमरावती बाजारात हरभऱ्याची आवक किती; कसा मिळला दर ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहरभराबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डजालना