Join us

Halad Bajar Bhav: हळदीच्या दरात सुधारणा; बाजारात प्रतिक्विंटल असा मिळाला दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:14 IST

Halad Bajar Bhav : मागील काही महिन्यांपूर्वी बाजारात हळदीचे दर कोसळले होते. आता नव्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मात्र हळदीला (Halad) समाधानकारक दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळात आहे.

Halad Bajar Bhav: मागील काही महिन्यांपूर्वी बाजारात हळदीचे दर कोसळले होते. आता नव्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मात्र हळदीला(Halad) समाधानकारक दर मिळत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी उत्पादनात घट येत असल्याने हळद(Halad) लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. सद्यस्थितीत हळदीला सरासरी १४ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना एकरात दीड ते दोन लाख रुपये निव्वळ नफा होत आहे.

सोयाबीन, कपाशीच्या उत्पादनात घट येत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हळद पिकाकडे(Halad Crop) कल वाढला आहे. सोयाबीन, तुरीचे दर घसरले असताना हळदीला समाधानकारक दर मिळत असल्याने यंदा हळद उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.

मागील काही वर्षापासून जिल्ह्यात हळदीच्या लागवडीत वाढ होत आहे. इतर पिकांच्या तुलनेत या पिकासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतात. तथापि, बाजारात या शेतमालास चांगला दर मिळतो आणि उत्पन्नाच्या तुलनेत कमी खर्च येतो. त्यामुळेच जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात वाढ होत आहे.

एक एकर क्षेत्रातून साधारणतः २० ते २२ क्विंटल हळदीचे उत्पादन होते. यासाठी जवळपास १ लाख ३५ हजार रुपयांचा खर्च येतो. जिल्ह्यात हळदीची बाजारपेठ नसली तरी इतर जिल्ह्यातील व्यापारी खरेदी करतात.

लागवड खर्चाच्या तुलनेत समाधानकारक दर !

नव्या हळदीचा हंगाम जोरावर असून, शेतमालाची आवक वाढत असतानाच मागणीत ही वाढ झाल्याने समाधानकारक दर मिळत आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बेणे विकण्यावरच शेतकऱ्यांचा भर!

हळदीच्या काढणीचा हंगाम सध्या सुरू आहे. हळदीच्या एक क्विंटल बेण्यातून साधारणतः २५ किलो हळद तयार होते. तयार हळदीला १५ हजार रुपयांपर्यंतचा दर आहेत, तर बेण्याला प्रतिक्विंटल ३ ते ४ हजारांचा दर मिळतो. त्यामुळे अनेक शेतकरी बेणे विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.

५० टक्के हळदीची काढणी पूर्ण जिल्ह्यात हळदीची काढणी वेगात सुरू असून, एकूण लागवड क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्रातील हळदीची काढणी उरकली आहे.

हळद काढणीला वेग

जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यासह इतरही भागात हळद पिकाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. चांगले दर असल्याने शेतकरी या पिकाकडे वळत असून, सध्या हळद काढणीला वेग आला आहे.

हळद लागवडीसाठी एकरी किती खर्च ?

बेणे५६,०००
शेणखत१२,०००
रासायनिक खते१२,०००
लागवड५,०००
विद्राव्य खते, फवारण्या१५,०००
इतर खर्च३५,०००

हे ही वाचा सविस्तर : Chemical Fertilizer: हंगामापूर्वीच झटका; खत दरवाढीचा बसणार फटका वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनतुरातूरबाजारमार्केट यार्ड