Join us

Halad BajarBhav : नवीन हळद बाजारात दाखल; मुहूर्ताला काय मिळाला भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:32 IST

Halad BajarBhav : शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणारी नवीन हळद हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात विक्रीसाठी येत आहे. जाणून घ्या कसा मिळतोय दर ते सविस्तर. (Halad BajarBhav)

Halad BajarBhav : शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणारी नवीन हळद हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात विक्रीसाठी येत आहे.(Halad BajarBhav)

सध्या या हळदीला १२ ते १३ हजार रूपये भाव मिळत आहे. परंतु, हा भाव लागवड खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे असून, भाववाढीची प्रतीक्षा केली जात आहे.(Halad BajarBhav)

मराठवाड्यासह विदर्भात हळद खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील मार्केट यार्डात मागीलवर्षी हळदीला सरासरी १४ ते १५ हजार रूपयांचा उच्चांकी भाव मिळाला. (Halad BajarBhav )

समाधानकारक भावामुळे हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यासह विदर्भातील वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातून हळदीची आवक झाली होती. दररोज सरासरी चार ते पाच हजार क्विंटल हळदीची आवक होत होती. (Halad BajarBhav)

चांगला भाव मिळाल्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी हळदीची लागवड जवळपास कायम ठेवली. त्यामुळे यावर्षी हळदीचे उत्पादन बऱ्यापैकी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात आता हळद काढणीला प्रारंभ झाला आहे. तर मोजक्या शेतकऱ्यांचे हळद काढणीचे काम अटोपले आहे. ते शेतकरी हळद विक्रीसाठी आणत आहेत. (Halad BajarBhav)

लिलावाच्या दिवशी दोन ते तीन शेतकरी नवीन हळद विक्रीसाठी आणत आहेत. ५ मार्च रोजी मार्केट यार्डात दोन शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली होती. त्यांच्या हळदीला सरासरी १२ हजार रूपयांचा भाव मिळाला. सध्या आवक कमी असली तरी येणाऱ्या दिवसांत आवक वाढणार आहे.

मागील वर्षीपेक्षा दोन ते अडीच हजाराने भाव कमी...

गेल्यावर्षी मार्च महिन्यात हळदीला सरासरी १३ ते १४ हजार रूपये भाव मिळाला होता. यंदा मात्र ११ हजार ५०० ते १२ हजार २०० रूपयांदरम्यान सरासरी भाव मिळत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असून, भाववाढीची प्रतीक्षा केली जात आहे. लागवड खर्चाचा विचार केल्यास हळदीला सरासरी १४ हजार रूपये भाव मिळावा, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

अतिवृष्टी, करपाने उत्पादनात घट

जिल्ह्यात ऑक्टोबरच्या प्रारंभी अतिवृष्टी झाली. यात नदी, नाल्याकाठची पिके जमिनीसह खरडून गेली होती. याचा फटका हळद पिकाला मोठ्या प्रमाणात बसला. त्यानंतर ऐन भरात असताना करपाचा ही प्रादुर्भाव झाला. त्यामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात घट होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जुनी हळद पाचशेंनी कमी...

भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर जुनी हळद विक्रीविना ठेवली. आता नवीन हळद बाजारात येत असल्यामुळे जुनी ठेवून काय करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे शेतकरी आता मिळेल त्या भावात जुनी हळद विक्री करीत आहेत. परंतु, या हळदीला नवीपेक्षा जवळपास पाचशे रूपये भाव कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

मोंढ्यात विक्रीसाठी आलेला शेतमाल

शेतमालआवक (क्विं.)सरासरी भाव
गहू२५०२,७८०
ज्वारी११०१,६५०
सोयाबीन६५०३,७६७
हरभरा९८०५,२००
हळद१८००११,५००

हे ही वाचा सविस्तर :Tur Kharedi : यंदा तूर खरेदी केंद्राकडे पाठ फिरवण्याचे काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती