Mahashivratri 2026: महाशिवरात्रीनिमित्त उपवासाच्या पदार्थांच्या किमतींनी गगन भरारी घेतली आहे. यंदाचा उपवास खऱ्या अर्थाने 'निरंकार' करण्याची वेळ भाविकांवर आली आहे. किरकोळ बाजारात शेंगदाणा आणि भगरीच्या दराने उच्चांक गाठला असून, फराळाचे ताट महागले आहे.
गेल्या अडीच दशकांत शेंगदाण्याचे भाव कधीही दोनशे रुपयांच्या पार गेले नव्हते. यंदा मात्र, उत्पादनातील घट आणि वाढत्या मागणीमुळे शेंगदाण्याने २५ वर्षाचा रेकॉर्ड मोडीत काढला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आवक बंद, निर्यात वाढल्याचा परिणाम
स्थानिक बाजारपेठांमध्ये शेंगदाण्याची आवक निम्म्यावर आली आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय शेंगदाण्याला मोठी मागणी असल्याने निर्यातीत वाढ झाली आहे. देशांतर्गत पुरवठा कमी आणि निर्यात जास्त झालेली आहे.
यंदा उत्पादन घट
यंदा शेंगदाणा उत्पादक पट्ट्यात पावसाच्या लहरीपणामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, देशांतर्गत शेंगदाण्याचे उत्पादन सुमारे ६० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी, साठवणूक कमी असून मागणी मात्र सातत्याने वाढत आहे.
पदार्थ - प्रतिकिलो दर
शेंगदाणा - १२५ ते १६५भगर - ९० ते १३०राजगिरा - ८० ते १२०शाबुदाणा - ६० ते ७०रताळ - २० ते ४०बटाटा - २० ते ३०
मागणी वाढल्याने दरवाढ
शेंगदाणा उत्पादन कमी झालेले आहे, तसेच मागणी वाढल्यामुळे शेंगदाण्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. मागील आठवड्यात दर मोठ्या प्रमाणात वाढले होते; परंतु सध्या भाव थोडेफार कमी झालेले आहेत. - राजेश शर्मा, किराणा व्यापारी, जालना.
केळी, बटाटा चिप्सची मागणी वाढली
• कच्च्या मालाचे भाव वाढले असले तरी तयार फराळाकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. उपवासासाठी लागणारे केळी वेफर्स आणि बटाटा चिप्सची मागणी बाजारात प्रचंड आहे.
• ब्रेडेड पाकिटांच्या तुलनेत घरगुती महिला बचत गट किंवा स्थानिक विक्रेत्यांनी बनवलेले 'होम मेड' चिप्स आणि फराळाचे पदार्थ ग्राहकांसाठी स्वस्त पर्याय ठरत आहेत.
हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा
Web Summary : Mahashivratri fasting staples like peanuts and barnyard millet hit record high prices. Reduced domestic peanut production, increased exports, and rising demand are blamed. Prices of other fasting foods also increased significantly affecting consumers.
Web Summary : महाशिवरात्रि के उपवास के लिए मूंगफली और भगर के दाम आसमान छू रहे हैं। व्यापारियों के अनुसार, उत्पादन में कमी, निर्यात में वृद्धि और बढ़ती मांग के कारण कीमतों में वृद्धि हुई है जिससे उपभोक्ताओं पर असर पड़ा है।