Join us

Grapes Market : उन्हाळ्यापूर्वी बाजारात द्राक्षे दाखल; पाहा काय आहेत यंदा भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:04 IST

Grapes Market : गोड, आंबट चवीची द्राक्षे बीडच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत. यंदा कसा मिळतोय भाव ते वाचा सविस्तर

आकाश सावंत

बीड : गोड, आंबट (Sour-sweet) चवीची द्राक्षे (grapes) म्हटल्यावर कुणाच्याही तोंडला पाणी सुटेल, अशा द्राक्षांची बीडच्याबाजारात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे, तर दिवसाला साधारणतः २ ते ३ टन द्राक्षांची विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

बाजारात (Market) यंदा चांगल्या प्रतीची असल्याने द्राक्षांची आवक (Arrive) वाढली. भाव टिकून राहण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे. सांगली, उस्मानाबाद, पुणे, बारामती येथील द्राक्षांना मोठी मागणी असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.

द्राक्षांचे विविध प्रकार

* शहरात काळ्या आणि हिरव्या द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. यात जम्बो, शरद जातींची काळे द्राक्षे बाजारात उपलब्ध आहेत. * बीडच्या बाजारातदररोज २-३ टन द्राक्षांची विक्री होते. * हिरव्या द्राक्षांमध्ये सोनाका, सुपर सोनाका, माणिक चमन या जातीच्या द्राक्षांना मागणी आहे, तर दर कमी-जास्त आहेत.

दर्जानुसार कॅरेटचा भाव (₹)

जम्बो (काळी द्राक्षे)१२०० ते १५००
शरद (काळे द्राक्षे)१४०० ते १६००
सुपर सोनाका८०० ते ११००
सोनाका६०० ते ८००
माणिक चमन५०० ते ६५०

मागणी आणखी वाढेल

द्राक्ष मालाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चवीलाही उत्तम आहेत. सध्या लोकांना खाण्यायोग्य द्राक्षे बाजारात दाखल झाली आहेत, तर संपूर्ण शहरात दिवसाला २ ते ३ टन द्राक्षांची विक्री होत आहे. या फळाला जसा उन्हाचा पारा वाढत जाईल तशी मागणी आणखी वाढत राहील. सध्या बाजारात द्राक्षाची मोठ्या प्रमाणावर आवक आहे. इतर जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी आहे. - रफिक बागवान, फळ विक्रेता

हे ही वाचा सविस्तर : Soybean Procurement: सोयाबीन खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा; पोर्टल सुरू असेपर्यंत खरेदी! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रद्राक्षेबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डबीड