Join us

Gahu Bajarbhav  : 2189 गव्हाला चांगला बाजारभाव मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 20:20 IST

Gahu Bajarbhav  : आज रविवार रोजी गव्हाची 74 क्विंटलची (Wheat Market) आवक झाली. यात बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे बाजारात ...

Gahu Bajarbhav  : आज रविवार रोजी गव्हाची 74 क्विंटलची (Wheat Market) आवक झाली. यात बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे बाजारात (Pune Wheat Market) हायब्रीड, अर्जुन आणि 2189 या वाणांची आवक झाली. तर कमीत कमी 2400 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

दौंड बाजारात 2189 गव्हाची 17 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 2300 रुपये आणि सरासरी 2800 रुपये दर मिळाला. तर सिल्लोड बाजारात अर्जुन गव्हाची 42 क्विंटलची आवक होऊन सरासरी 2700 रुओये आणि बुलढाणा बाजारात हायब्रीड गव्हाला कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 2400 रुपये दर मिळाला.

खुल्या बाजारात दर ३५०० पेक्षा अधिक

बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या गव्हाला सध्या प्रतिक्विंटल 2800 रुपयांचा दर दिला जात आहे. तोच चांगल्या दर्जाचा गहू खुल्या बाजारात मात्र प्रतिक्विंटल 3500 रुपयांपेक्षा अधिक दराने विक्री केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून गव्हाची आवक तुलनेने वाढलेली आहे. मात्र, सध्या रब्बी हंगाम सुरू असून नवा गहू बाजारात दाखल व्हायला बराच अवधी शिल्लक आहे. त्यामुळे हा गहू शेतकऱ्यांचा की व्यापाऱ्यांचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाला चांगला दर मिळत असल्याने परजिल्ह्यांतील शेतकरी देखील त्यांचा माल याठिकाणी विक्रीला आणत असल्याचे दिसत आहे.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/12/2024
दौंड२१८९क्विंटल17230032002800
सिल्लोडअर्जुनक्विंटल42265027602700
बुलढाणाहायब्रीडक्विंटल15200028002400
टॅग्स :गहूमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती