Join us

Flower Market : मार्गशिर्ष महिन्यात फुलांचा दरवळ बाजारात पसरणार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 16:59 IST

उद्यापासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात झेंडू, शेवंती, निशिगंध, शेवंती या फुलांना मागणी वाढण्याची शक्यता आहे. (Flower Market)

Flower Market :  थंडीमुळे फुलांच्या उत्पादनात घट  झाली आहे. नुकत्याच निवडणुकाही पार पडल्या आहेत त्यामुळे आता फुलांना बाजारात मागणी नसल्याने शहरातील फुलांचा बाजार गारठल्याचे चित्र दिसत आहे. फुलांचे दरही घसरले आहेत. परंतू उद्या (२ डिसेंबर) पासून सुरू होणाऱ्या मार्गशिर्ष महिन्यात बाजारात फुलांची मागणी वाढेल.

झेंडू, शेवंती, निशिगंध, शेवंती या फुलांना उद्यापासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दरवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरवाढल्यास व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  दिवाळीनंतर फुलांना मागणी नसल्याने तसेच थंडी सुरू झाल्यानंतर फुलांचे उत्पादन कमी होते त्यामुळे बाजारात आवक घटली आहे.

निशिगंध, झेंडू, शेवंती, गुलाबाचे दर कमी आहेत. निशिगंध, शेवंती या पांढऱ्या फुलांचे दर शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत आले आहेत. दिवाळीत शंभर रुपये दर मिळालेला झेंडू आता चाळीस रुपये आहे.

उद्या (२ डिसेंबर) पासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची पूजा, दत्त जयंती, वास्तुशांती व इतर कार्यक्रमामुळे फुलांच्या दरात तेजी येणार आहे. फुलांचे दर व मागणीही कमी असल्याने बाजारात उलाढाल घटली आहे. फुलांच्या दरवाढीसाठी व्यापारी व फूल उत्पादक शेतकऱ्यांना मार्गशीर्ष महिन्याची वाट पाहत आहेत.

झेंडू पुन्हा ४० रुपयांवर

थंडीमुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. उत्पादन घटले तरीही मागणी अभावी फुलांचे दर कमी आहेत. झेंडूचा दर दिवाळीनंतर २० रुपयांपर्यंत घसरला होता. मात्र आता मार्गशीर्ष महिन्यामुळे झेंडू पुन्हा ४० रुपयांवर आला आहे.

फुलांचा प्रकारदर
निशिगंध१५० रुपये किलो
झेंडू          ४० रुपये किलो
गुलाब          ५०० रुपये शेकडा
शेवंती            १५० रुपये किलो
टॅग्स :शेती क्षेत्रफुलशेतीफुलंबाजारशेतकरीशेती