Join us

Cotton Market : 'सीसीआय'ने यवतमाळ जिल्ह्यात 'इतक्या' कोटींचा कापूस केला खरेदी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 17:53 IST

cotton market : शेतकरी शासकीय केंद्रात चांगला दर मिळत असल्याने दिवसेंदिवस गर्दी करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून यवतमाळ बाजारातील कापूस खरेदी बंद करण्यात आली होती ती आजपासून पूर्ववत करण्यात आली आहे.

यवतमाळ : खासगी बाजारामध्येMarket कापसाचेCotton दर घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा कल सीसीआयच्याCCI कापूस खरेदी केंद्रांकडे वळला आहे. यातून केंद्रावरCenter क्षमतेपेक्षा अधिक कापसाची खरेदी झाल्याने काही ठिकाणी कापूस खरेदी थांबविण्यात आली होती. या ठिकाणी आज गुरुवारपासून पुन्हा कापूस खरेदी सुरू झाली आहे. सीसीआयने आतापर्यंत ३५० कोटींचा ५० लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.

यवतमाळ जिल्हा कापसासाठी प्रसिद्ध आहे. त्यात लांब धाग्याचा कापूस पिकविणारा पट्टा म्हणून घाटंजी, राळेगाव, पांढरकवडा, वणी हा भाग ओळखला जातो. या ठिकाणी कापसाची सर्वाधिक खरेदी झाली आहे.

विशेष म्हणजे याच पट्टयात खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीसाठी यंत्रणा उभी केली. परंतु, खुल्या बाजारात कापसाचे दर कमी असल्याने खासगी खरेदीदारांकडे शेतकरी फिरकले नाहीत. पुढील काही दिवसात सीसीआयच्या केंद्रांवर आणखीन कापूस येणार आहे. यामुळे सर्वाधिक कापूस खरेदीचा रेकॉर्डही होण्याची शक्यता आहे.

...असा खरेदी झाला कापूस

* वणी विभागात सर्वाधिक २ लाख ५८ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यामध्ये वणी आणि शिंदोला या ठिकाणी १ लाख ४५ हजार ४५२ क्चिटल कापूस खरेदी झाला.

* पांढरकवडा केंद्रावर ७१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. झरी केंद्रावर खैरीमध्ये ३१ हजार २९८ क्विंटल कापूस खरेदी झाला.

* यवतमाळ केंद्रावर ३३ हजार ६५, राळेगाव केंद्रावर ११ हजार ३६६, वाढोणा बाजार केंद्रावर १५ हजार ९२०, घाटंजी केंद्रावर ६२ हजार ८०४. दारव्हा केंद्रावर ३० हजार ८०६, दिग्रस केंद्रावर ४४ हजार ९८, पुसद केंद्रावर २७ हजार ६५३, गुंज केंद्रावर ८ हजार ३८० क्विंटल कापूस खरेदी झाला. ७ हजार ५२१ रुपये क्विंटल दराने ३५० कोटी रुपयांचा कापूस आतापर्यंत सीसीआयने खरेदी केला.

यवतमाळ केंद्रावर आजपासून खरेदी

* यवतमाळ केंद्रावर कापसाची आवक क्षमते बाहेर गेल्याने २० डिसेंबरपासून खरेदी बंद करण्यात आली होती. जिनिंगसाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून २५ डिसेंबरपर्यंत सीसीआयचे केंद्र यवतमाळात बंद ठेवण्यात आले होते.

* आज गुरुवारपासून या ठिकाणी कापूस खरेदी पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे या केंद्रावर आणखी गर्दी होणार आहे.

* हवामान विभागाने २८ डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सीसीआयसह शेतकऱ्यांना कापूस खरेदीवेळी काळजी घ्यावी लागणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Ladki Bahin Yojana New Update : राज्यातील 'लाडक्या बहिणीं'ची संक्रांत झाली गोड; खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा

टॅग्स :शेती क्षेत्रकापूसबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड