गतवर्षीपेक्षा चालू वर्षी मिरचीचे दर चांगलेच कडाडले आहेत. मिरचीची आवक कमी मात्र दर दुपटीने वाढल्याने गत वर्षीच्या तुलनेत मिरची भलतीच तिखट झाली असल्याचे दिसून येत आहे.
बेगडी, संकेश्वरी, तेल्या, गुंटूर या जातीच्या मिरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत. याशिवाय मसाल्याच्या दरातही २० ते ३० टक्के वाढल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी मिरचीचे दर हे ३५० ते ४०० रुपये किलो होते. त्यामध्ये चालू वर्षी ७० ते ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातील काही प्रमाणात ग्रामीण भागातून मिरचीची आवक झाली आहे.
कडक उन्हाळ्यातच चटणीचे कांडप चांगले होते. त्यामुळे वर्षभर पुरेल इतकी चटणी केली जाते. त्यातच जानेवारी महिन्यापासूनच नवीन मिरची मोठ्या प्रमाणात बाजारात येते.
सुकामेव्याचे दर देखील वाढले
बाजारात जानेवारी महिन्यापासूनच नवीन मिरची आवक होते. सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने त्यातच मिरचीचे दर हे गतवर्षीपेक्षा दुपटीने व मसाल्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांच्यात चांगलीच नाराजी दिसत आहे.
त्यामुळे व्यवसायावर थोडा फार परिणाम दिसत आहे. मिरचीचे दर गतवर्षीपेक्षा दुपटीने वाढल्याने व मसाल्याच्या दरातही वाढ झाल्याने मसाला बनविण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या सध्या चांगलीच रोडावली आहे.
मिरचीचे सध्याचे दर/मागील वर्षाचे दर (प्र. क्वी.)
| सध्याचे दर | मागील वर्षाचे दर | |
| गुंटूर | २३० ते २५० | १६० ते १८० |
| संकेश्वरी | २७० ते ३०० | १५० ते १७० |
| लवंगी | २५० ते २८० | १८० ते २०० |
| बेडगी | ३८० ते ४२० | २०० ते २४० |
| काश्मिरी बेडगी | ५०० ते ८०० | २५० ते २८० |
मसाल्याचे सध्याचे दर/मागील दर
| मागील दर | चालू दर | |
| जिरा | २६० ते २८० | ३४० ते ३८० |
| खोबरे | २०० ते २५० | ३८० ते ४०० |
| धने | १२० ते १३० | १५० ते १६० |
| तीळ | १४० ते १५० | १६० ते १७० |
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Chili prices have doubled compared to last year due to lower supply from Karnataka and Andhra Pradesh. Spice prices have also increased by 20-30%. Consumers are facing challenges as chili and spice rates soar, impacting household budgets and business.
Web Summary : कर्नाटक और आंध्र प्रदेश से कम आपूर्ति के कारण पिछले साल की तुलना में मिर्च की कीमतें दोगुनी हो गई हैं। मसालों की कीमतों में भी 20-30% की वृद्धि हुई है। मिर्च और मसालों की कीमतें बढ़ने से उपभोक्ताओं को चुनौतियों का सामना करना पड़ रहा है, जिससे घरेलू बजट और व्यवसाय प्रभावित हो रहे हैं।