Join us

Chia Market : वाशिमच्या बाजारात चियाची २२०० क्विंटल आवक; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:01 IST

Chia Market : वाशिम येथील बाजार समितीत ११ फेब्रुवारीपासून चियाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. आठवड्यात केवळ शनिवारी चियाची खरेदी (Chia Market) केली जात आहे.

Chia Market : वाशिम येथील बाजार समितीत ११ फेब्रुवारीपासून चियाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. आठवड्यात केवळ शनिवारी चियाची खरेदी (Chia Market) केली जात आहे.

आता वाशिम बाजार समितीत चियाची आवक वाढू लागली आहे. शनिवार (८ मार्च) रोजी या बाजार समितीत तब्बल २ हजार २०० क्विंटल चियाची आवक (Chia Arrivals) झाली, तर या शेतमालाच्या दरात सुधारणाही दिसून आली.(Chia Market)

वाशिम बाजार समितीत ११ फेब्रुवारीपासून या चिया पिकाची खरेदी सुरू करण्यात आली. मुहूर्ताच्या खरेदीत या शेतमालास कमाल २३ हजार रुपये आणि किमान १२,००१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. (Chia Market)

मुहूर्ताच्या खरेदीत या बाजारात २५ क्विंटलची आवक झाली. त्यानंतर या शेतमालाची आवक वाढतच गेली. शनिवार, (८ मार्च)रोजी बाजार समितीत तब्ब्ल २ हजार २०० क्विंटल चियाची आवक झाली होती.(Chia Market) कृषि उत्पन्न बाजार समिती वाशिम १३ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

जिल्ह्यात ३ हजार ६०८ हेक्टरवर चियाची लागवड

* मागील तीन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी चिया पिकाकडे वळत आहेत. यंदा या पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.(Chia Market)

* कृषी विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ३ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर यंदाच्या रब्बी हंगामात चियाची पेरणी झाली आहे. मागील तीन वर्षांत यंदा चियाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

काढणी अंतिम टप्प्यात

* यंदाच्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी गहू आणि हरभऱ्याकडे पाठ करून चियाच्या लागवडीवर भर दिला.

* शेतकऱ्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आणि पीक चांगलेच बहरले. आता जिल्ह्यात या पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, शेतकरी काढणीनंतर बाजारात विक्रीवर भर देत असल्याने पुढे या शेतमालाची आवक आणखी वाढणार आहे. त्यामुळे भावात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

अशी वाढत गेली चियाची आवक (क्विंटल)

११ फेब्रुवारी२५
१५ फेब्रुवारी८५०
२२ फेब्रुवारी७५०
१ मार्च१२००
८ मार्च२२००

हे ही वाचा सविस्तर : Chia Seeds : 'चिया सीड्स'ची बाजारात एन्ट्री; प्रारंभी काय मिळाला दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती