CCI Cotton Market : हिंगोली शहराजवळील लिंबाळा (मक्ता) भागात सीसीआयच्या (CCI) वतीने ९ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी (Cotton Market) करण्यात येत असून, जागेच्या प्रश्नामुळे ११ फेब्रुवारीपासून खरेदी बंद ठेवण्यात आली होती.
आता जागेचा प्रश्न सुटला असून, २४ फेब्रुवारीपासून कापूस खरेदी ( Cotton Market) सुरळीत होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
यंदा खुल्या बाजारात कापसाने ७ हजारांचाही पल्ला गाठला नाही, तर सीसीआय खरेदी केंद्रावर डिसेंबरपर्यंत ७ हजार ५२१ रुपये प्रतिक्विंटलचा भाव देण्यात आला. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
डिसेंबरच्या शेवटीपासून कापसाची आवक मंदावली असून, जानेवारी महिन्यात दररोज ५० ते ७० क्विंटल कापसाची खरेदी झाली. केंद्र परिसरात खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याने ११ फेब्रुवारीपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद होती. आता कापसाच्या गाठी, सरकी इतरत्र हलविण्यात आल्यामुळे जागेचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे सोमवारपासून कापूस खरेदी सुरळीत होणार आहे.
चांगल्या प्रतीचा कापूस आवश्यक...
खुल्या बाजारात कापूस चांगल्या प्रतीचा नसल्याचे कारण पुढे करीत ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयाने खरेदी होत आहे, तर सीसीआयकडून ७ हजार ४२१ रुपये भाव दिला जात आहे. चांगल्या प्रतीचा कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन केले आहे.
हे ही वाचा सविस्तर :