Black Turmeric Market : वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (२६ एप्रिल) रोजी झालेल्या लिलावात कोच्याला म्हणजेच काळ्या हळदीला चांगला दर मिळाला आहे. (Black Turmeric)
बाजार समितीमध्ये काळ्या हळदीला नेहमी चांगला दर मिळत असतो. यात शनिवारी (२६ एप्रिल) रोजी किमान दर हा १८,४०० प्रती क्विंटल मिळाला तर कमाल दर हा २३,५०० प्रती क्विंटल इतका भाव मिळाला.
वाशिम बाजार समितीच्या मार्केट यार्डात कोच्याची आवक ११,३०० क्विंटल नोंदविण्यात आली. (Black Turmeric)
कोच्या, ज्याला 'काळी हळद' असेही म्हटले जाते. मुख्यत्वे हळदीच्या काढणीनंतर जमिनीत राहिलेल्या आणि कालांतराने वाळून गेलेल्या कंदापासून काळी हळद तयार होते. (Black Turmeric)
शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या हळदीच्या लागवडीत जमिनीत राहून गेलेल्या कंदातून ही काळी हळद तयार होते.
सध्या जिल्ह्यात हळदीची काढणी अंतिम टप्प्यात असून, काही शेतकरी कोच्या हळदीची वेगळी काढणी करत आहेत. त्यामुळे बाजारात कोच्याची आवक वाढली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काळी हळदी आरोग्यादायी असल्याने आता शेतकरी या हळदीकडे वळताना दिसत आहेत. शिवाय बाजारातही याला चांगला दर मिळतो आहे.