Join us

APMC Hingoli : सोमवारी शेतमालाचा लिलाव राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:50 IST

APMC Hingoli : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार सोमवारी राहणार बंद.

APMC Hingoli : श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून, दुसऱ्या श्रावण सोमवारी १२ ऑगस्ट रोजी हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा मोंढा व हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.पवित्र श्रावणानिमित्त जिल्हाभरातील शिवालयांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत, तसेच भाविकांकडून कावडयात्रेचे आयोजनही केले जात आहे. त्यामुळे १२ ऑगस्ट रोजी सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद राहतील, असे बाजार समितीने कळविले आहे.

आज भुईमुगाचे बीट बंदमागील आठवड्यात नाणे टंचाईमुळे मोंढ्यातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सोमवारपासून व्यवहार सुरळीत झाले असून, शेतमालाची आवक वाढली आहे. त्यामुळे ८ ऑगस्ट रोजी भुईमुगाचे बीट बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.