राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (एपीएमसी) भाजीपाला अडते, व्यापारी, मापारी, हमाल तसेच इतर परवानाधारक घटकांना दरवर्षी परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी परवाना नूतनीकरणाची मुदत १ ते २८ फेब्रुवारी अशी निश्चित करण्यात आली असून, या कालावधीत नूतनीकरण न केल्यास प्रती दिवस १० टक्के दंड आकारण्यात येणार आहे.
दंडासह नूतनीकरण करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. परवाना नूतनीकरणामुळे बाजारातील व्यवहारांना कायदेशीर अधिष्ठान मिळते, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे, वजन-मापात पारदर्शकता राखणे आणि दरनिर्धारणात शिस्त ठेवणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे.
१ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत परवाना नूतनीकरणासाठी संबंधितांनी बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. २८ फेब्रुवारीनंतर नूतनीकरणासाठी प्रती दिवस १० टक्के दंड आकारणी करून ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत आहे. ३१ मार्चनंतर नूतनीकरण होणार नाही. - वामन सोळंके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम.
अन्यथा बाजार समिती आवारात व्यवहार करण्यास मनाई केली जाणार!
• भाजीपाला अडते, व्यापारी, मापारी, हमाल तसेच इतर परवानाधारक घटकांना दरवर्षी परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात परवाना नूतनीकरणाचा मुहूर्त असून, २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.
• त्यानंतर ३१ मार्चपर्यंत दंडासह परवाना नूतनीकरणाची अंतिम मुदत आहे. ही मुदत संपल्यानंतर नूतनीकरण न केलेल्या परवानाधारकांना बाजार आवारात व्यवहार करण्यास मनाई केली जाणार आहे.
• बाजार समिती प्रशासनाने सर्व अडते, व्यापारी, मापारी व हमाल यांनी दिलेल्या वेळेत परवाना नूतनीकरण करून दंड टाळावा, असे स्पष्ट केले आहे. नूतनीकरणासाठी संबंधितांनी बाजार समितीकडे विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असून, यामध्ये जुन्या परवान्याची प्रत, आवश्यक शुल्क व कागदपत्रे सादर करावी लागतात.
Web Summary : Renew APMC licenses by February 28th to avoid penalties. A 10% daily fine applies after, with a March 31st deadline. Renewal ensures legal transactions, transparency, and fair pricing for farmers. Failing to renew prohibits market activity.
Web Summary : जुर्माने से बचने के लिए 28 फरवरी तक एपीएमसी लाइसेंस का नवीनीकरण करें। इसके बाद 10% दैनिक जुर्माना लगेगा, जिसकी अंतिम तिथि 31 मार्च है। नवीनीकरण किसानों के लिए कानूनी लेनदेन, पारदर्शिता और उचित मूल्य निर्धारण सुनिश्चित करता है। नवीनीकरण करने में विफलता बाजार गतिविधि को प्रतिबंधित करती है।