Join us

World Soil Day 2024 : मातीला होऊ देऊ नका बाधित; आरोग्य संपन्न भविष्य तरच राहील अबाधित

By रविंद्र जाधव | Updated: December 5, 2024 08:00 IST

World Soil Day 2024 : मातीचे योग्य संवर्धन आणि संरक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. याच दृष्टीकोनातून प्रत्येक वर्षी ५ डिसेंबर रोजी 'मृदा दिन' साजरा केला जातो. ज्या मागे मातीच्या (Soil) संवर्धनाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि तिच्या संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा हेतु आहे. 

मानवी जीवनाशी संलग्न असलेला एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे माती. मातीशिवाय जीवनाचा अस्तित्व असूच शकत नाही. माती ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे.

मात्र यासोबतच तिचे योग्य संवर्धन आणि संरक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. याच दृष्टीकोनातून प्रत्येक वर्षी ५ डिसेंबर रोजी 'मृदा दिन' साजरा केला जातो. ज्या मागे मातीच्या संवर्धनाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि तिच्या संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा हेतु आहे. 

मृदा दिनाचे महत्त्व

मातीच्या महत्त्वाबद्दल सांगितले तरी ते कमीच पडते. माती हाच आपला अन्नस्रोत आहे. मातीची गुणवत्ता जितकी चांगली असते तितकेच अधिक चांगले अन्न उत्पन्न होते. मातीमधील सूक्ष्मजिवाणू आणि इतर सूक्ष्मजीव त्या मातीला उपयुक्त बनवितात. त्यामुळे मातीची योग्य देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. मृदा दिन हे या मुद्द्यांकडे लक्ष वेधून घेतो आणि मातीचे महत्व समजावून सांगतो.

मृदा दिनाचा इतिहास

इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सने २००२ मध्ये दरवर्षी ५ डिसेंबर रोजी 'जागतिक मृदा दिवस' साजरा करण्याची शिफारस केली. FAO ने थायलंड राज्याच्या नेतृत्वाखाली जागतिक मृदा दिनाच्या औपचारिक स्थापनेला आणि जागतिक मृदा भागीदारीच्या चौकटीत जागतिक जागरुकता वाढवणारे व्यासपीठ म्हणून समर्थन दिले.

ज्यातून पुढे जून २०१३ मध्ये FAO च्या परिषदेने जागतिक मृदा दिनाला एकमताने मान्यता दिली. तसेच ६८ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत अधिकृतपणे स्वीकारण्याची विनंती केली आणि संयुक्त राष्ट्र महासभेने आपल्या ६८ व्या अधिवेशनात डिसेंबर २०१३ मध्ये ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला. पुढे ५ डिसेंबर २०१४ रोजी पहिला जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.

मृदा दिनाच्या उपक्रमांचा उद्देश

मृदा दिनाचा मुख्य उद्देश मातीच्या रक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीला जागरूक करणे आहे. मातीचा अत्यधिक शोषण, अयोग्य पद्धतीने शेती करणे, केमिकल्सचा अति वापर यामुळे मातीची गुणवत्ता कमी होत आहे. यामुळे पर्यावरणास मोठा धोका आहे म्हणून मृदा दिनाच्या माध्यमातून लोकांना मातीच्या संवर्धनाचे महत्व सांगितले जाते. शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन, रासायनिक खतांचा कमी वापर, पिकांच्या अवशेषांचे पुनर्चक्रण पद्धती याबाबत मार्गदर्शन केले जाते. यामुळे मातीच्या आरोग्याचे संरक्षण करता येईल.

जबाबदारी म्हणून करा मातीचे रक्षण आणि संवर्धन

मातीच्या संरक्षणासाठी सर्व घटकांतील नागरिकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. मृदा दिन हा दिवस मातीच्या महत्वाकांक्षी कार्यामध्ये एक वर्धन करणारा ठरतो. मातीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जर सर्वजण पुढे आले तर निसर्गाच्या आशीर्वादाने आपले भविष्य आणि आरोग्य उज्जवल होईल. 

हेही वाचा : Farmer Success Story : मराठवाड्याच्या कोरडवाहू शेतीला सेंद्रिय जोड देत आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याची वाचा यशकथा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरी