Join us

WISMA : विस्माचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांची सेन्ट्रल रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्य म्हणून नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:45 IST

बी.बी.ठोंबरे अध्यक्ष असलेल्या विस्मा, पुणे या खाजगी साखर संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी दिलेले बहुमोल योगदान व ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामीण अर्थकारण,जलसंधारण, कृषिमाल प्रक्रिया उद्योग व प्रामुख्याने साखर उद्योगामध्ये अनेक नाविण्यपूर्ण प्रयोग करून ग्रामीण विकासाला व प्रामुख्याने साखर उद्योगाला दिशा देण्याचे बहुमोल कार्य केलेले आहे.

Pune : वेस्ट इंडियन शुगर मील्स् असोसिएशन या खाजगी साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांची सेन्ट्रल रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्य म्हणून निवड झाली आहे. यासंदर्भात सेन्ट्रल रेल्वेने नुकतेच २६ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे कळवले आहे.

सेन्ट्रल रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्य म्हणून विस्माचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे हे महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या कार्यकक्षेतील सर्व प्रकारच्या सेवा उपभोक्ता सल्लागार समितीवर सदस्य म्हणून महाराष्ट्रातील साखर उद्योग तसेच अन्नधान्य वाहतुक व विविध उपभोक्तांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यांची नियुक्ती  ३० सप्टेंबर २०२६ अखेर पुढील २ वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आल्याचे मध्य रेल्वे महा प्रबंधक यांनी कळवले आहे.

दरम्यान, बी.बी.ठोंबरे अध्यक्ष असलेल्या विस्मा, पुणे या खाजगी साखर संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी दिलेले बहुमोल योगदान व ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामीण अर्थकारण,जलसंधारण, कृषिमाल प्रक्रिया उद्योग व प्रामुख्याने साखर उद्योगामध्ये अनेक नाविण्यपूर्ण प्रयोग करून ग्रामीण विकासाला व प्रामुख्याने साखर उद्योगाला दिशा देण्याचे बहुमोल कार्य केलेले आहे. त्यांच्या प्रयोगशिलतेचा व उद्योगातील अनुभवाचा लाभ होणेचे दृष्टीने सेन्ट्रल रेल्वे बोर्डाने सदर कमिटीवर सदस्य म्हणून त्यांची निवड केली आहे.

बी.बी.ठोंबरे यांच्या निवडीमुळे सेन्ट्रल रेल्वे बोर्डा मार्फत साखर उद्योग व धान्य वाहतुकीसह ईतर सर्व रेल्वे उपभोक्त्यांना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना याबाबत रेल्वे सोबत संवाद साधून त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने बी.बी.ठोंबरे नक्कीच योग्य ते मार्गदर्शन व सूचना करतील आणि त्याचा सेन्ट्रल रेल्वे बोर्ड आणि देशातील शेतक-यांना रेल्वे वाहतुकीचे माध्यमातून नक्कीच लाभ होईल.    

बी.बी.ठोंबरे यांचे सेन्ट्रल रेल्वे बोर्डाचे अॅडव्हायझरी कमिटीवर सदस्य म्हणून निवड झाल्या बद्दल विस्माचे सर्व सदस्य साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, साखर उद्योगातील मान्यवर, नॅचरल शुगरचे संचालक, प्रवर्तक यांनी बी.बी.ठोंबरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीऊस