Join us

शेतशिवारात बागायतदारांचा शत्रू बनलेल्या माकडांना आवरणार कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:14 IST

ग्रामीण भागासह अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे सुपारी, नारळ, काजू, आंबा बागायतदार यांच्यासह खरीप हंगामातील नगदी पिके घेणारे शेतकरी, बागायतदार चिंतेत आहेत. गेले काही दिवस पडत असलेल्या थंडीमुळे फळझाडांना फुलोरा आला असतानाच हे नवीन संकट निर्माण झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे सुपारी, नारळ, काजू, आंबा बागायतदार यांच्यासह खरीप हंगामातील नगदी पिके घेणारे शेतकरी, बागायतदार चिंतेत आहेत. गेले काही दिवस पडत असलेल्या थंडीमुळे फळझाडांना फुलोरा आला असतानाच हे नवीन संकट निर्माण झाले आहे.

काही भागात सुपारी पिकांच्या बागा सध्या फुलण्याच्या तयारीत आहेत. काही भागात खरीप हंगामातील नगदी पिके आता तयार होऊ लागली आहेत. त्याचदरम्यान माकडांकडून नासधूस होण्याची भीती बागायतदारांना आहे. २४ तास आपल्या बागांमध्ये जिवाचे पार कष्ट करून हाती काहीच लागणार नाही, अशी दयनीय अवस्था आहे.

बागायतदार शेतकऱ्यांनी या प्रश्नाकडे वन विभाग आणि शासनाचे अनेक वेळा लक्ष वेधले असून, वन विभागाने माकडांचा उपद्रव थांबावा यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अवैध जंगल अलीकडे तर माकडे घरांच्या छपरावरून टोळक्याने उड्या मारुन घरांची नासधूस करीत असूनतोडीमुळे जंगले ओसाड झाल्याने माकडांचे खाणे नष्ट होत असून, ती उदरनिर्वाहासाठी दिवसेंदिवस शहराच्या दिशेने कूच करीत आहेत.

खाण्यासाठी घराच्या खिडकीतून घरात शिरून खाण्याच्या वस्तूंची नासधूस करण्याचे प्रकार खूप मोठ्चा प्रमाणात वाढले आहेत. देवाच्या रूपात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिक असल्याने त्यांना जीवितहानी पोहोचणे कठीण झाले आहे.

मात्र, माकडांचा बंदोबस्त न झाल्याने गावात त्यांचा उपद्रव असह्य होत आहे. याअगोदर केवळ गावातच उपद्रव करणारे माकड आता शहराकडेदेखील वळले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात तर या माकडांनी उच्छाद मांडला आहे. वेगवेगळ्या अपार्टमेंट किंवा बंगल्याच्या, बाल्कनीतून किचनच्या ओट्यापर्यंत ही माकडे घुसत असून किचनमधील सामान घेऊन धूम ठोकत आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागातच माकडांचा उपद्रव वाढत चालला आहे.

परसबाग संकटात तर कौलारू, नळ्यांच्या घरांचे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जंगल संपत्ती आहे. येथील जंगलात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतात. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या संख्येने असणाऱ्या माकडांनी सध्या शेतकरी, बागायतदारांना हैराण केले आहे. माकडांचा गावात उपद्रव वाढल्याने परसबाग संकटात आली असून गावातील कौलारू किंवा नळ्यांच्या कच्च्या घरांचे मोठे नुकसान होत आहे. माकडांचा उपद्रव गावकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.

नगदी पिकांना धोका

सध्या ग्रामीण भागात उन्हाळी नगदी पिके घेतली जात आहेत. यात मिरवी, पालेभाज्या, कुळीथ, भुईमूग, नाचणी आदी पिकांचा समावेश असतो. मात्र, या पिकांची नासधूस करून माकड़ शेतकऱ्यांचा शबू बनला आहे. खाणे कमी आणि झाडाचे नुकसान अधिक असे विचित्र काम माकड करीत आहेत. गावात असलेले अनेक आहे संकठात आली आहे. या झाडांवरील फळांची नासधूस करतानाच घरावर उड्या मारण्याचे काम है माकड करतात. यातून वादविवादही वाढत आहेत,

शेतकरी, बागायतदार मेटाकुटीला

माकडांचा बंदोबस्त करण्याकरिता वनविभागाकडे कायदेशीर कोणतेही उपाययोजना नाही. तरीपण वन विभागाचे सहकारी व ग्रस्त नागरिक यांच्याशी चर्चा करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. माकडांकडून होणाऱ्या नुकसान भरपाईदेखील वनविभागाकडून मिळत नाही. त्यामुळे शेतकरी, बागायतदार मेटाकुटीला आला आहे.

भरवस्तीत थाटलाय निवारा

• तरुण मुले किंवा बालगोपाळ हातात लाठ्या धरून त्याना हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या कोलांटउड्या मारण्यामुळे घराचे तसेच झाडांचे सुमार नुकसान होत आहे. एका घरावरून दुसन्या घरावर, या छतावरून त्या हातावर उड्या मारीत असल्याने कित्येक छतांचे नुकसान करीत आहेत.

• पाण्याच्या टाक्या व त्यावरील आच्छादन, झाकण, पाइपलाइन धोक्यात आल्या आहेत. जंगलात असलेले त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडून वे गावातच का स्थिरावतात याचा वनविभागाकडून अभ्यास होणे गरजेचे आहे. गत चार पाच वर्षांपासून माकडांनी भरवस्तीत आपला निवारा थाटल्याने घरांची नासधूस होत आहे.

महेश सरनाईकउपमुख्य उपसंपादक, लोकमत सिंधुदुर्ग

हेही वाचा : शाळेतील शेतकऱ्यांची मुलं म्हणताहेत 'आमची भाजी आम्ही पिकवू'

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीमाकड