Join us

गाळमुक्त धरण योजनेत कोणत्या जिल्ह्याला किती मिळाला निधी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 4:34 PM

एकूण १८ कोटी ५३ लाख ९१ हजार ४६९ रुपयांचा निधी वितरित.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये गाळ काढण्याची कामे करण्यात येत असून या कामांसाठी 18 कोटी 53 लाख 91 हजार 469 रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय मृदा व जलसंधारण विभागाने घेतला आहे. पावसाळ्यात पाणी साठवणूकीसाठी विविध कामे हाती घेण्यात आली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी या निधीस मान्यता देण्यात आली आहे. त्याचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात राबविण्याचा निर्णय 2023 मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार या योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये गाळ काढण्याची कामे करण्यात येतात. 29 डिसेंबर रोजी आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अनेक ठिकाणी मशीनद्वारे गाळ काढणे शक्य होत नाही त्यामुळे कामे रखडतात असे निदर्शनास आले. अशासकीय संस्था उपलब्ध नसल्यास अशावेळी ग्रामपंचायतीमार्फत ही कामे करण्यात यावीत असे निर्देश या बैठकीत देण्यात आले होते. 

या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची देयके अदा करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून निधी वितरित करण्यात आला असून कोणत्या जिल्ह्यात किती निधी द्यावा याचे विवरण पत्रही देण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोणत्या अशासकीय संस्थांना देण्यात आले गाळ काढण्याचे काम?

धाराशिव- राष्ट्रतेज बहुउद्देशीय सामाजिक संस्था कसई, तुळजापूर- 52 लाख 95 हजार 201 रुपये

वाशिम -श्री एकलव्य सेवाभावी संस्था परभणी व इतर-चाळीस लाख 44 हजार 868 रुपये

वर्धा- अश्वमेघ ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास संस्था व इतर दोन संस्था-29 लाख 47 हजार 695 रुपये

सोलापूर -लोकमंगल फाउंडेशन संस्था-चार कोटी ११ लाख 97 हजार 821 रुपये

नागपूर -स्वच्छ असोसिएशन संस्था-27 लाख 32 हजार

पुणे- नाम फाउंडेशन- 35 लाख 3 हजार 757 रुपये

बुलढाणा- जिजामाता शिक्षण क्रीडा व बहुउद्देशीय संस्था-आठ कोटी 65 लाख 77 हजार 252 रुपये

परभणी- राजीव गांधी मजूर सहकारी संस्था -आठ कोटी 65 लाख 77हजार 252

नंदुरबार -नवनिर्माण शैक्षणिक व ग्रामीण विकास केंद्र -56 लाख 5 हजार

गडचिरोली- अविष्कार बहुउद्देशीय विकास मंडळ-36 लाख 64 हजार 998

सांगली- नवजीवन ग्रामविकास प्रतिष्ठान सोलापूर- 74 लाख 8 हजार 835

लातूर- के अप्पाराव भोसले बहुउद्देशीय सेवाभावी गोंद्री -65 लाख 98 हजार

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पपाणीसरकारी योजना