Join us

शेतकऱ्यांनो फिक्स्ड डिपॉझिट किंवा कर्ज काढण्यासाठी कोणती बँक निवडाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 3:15 PM

कांमधील लिक्वीडिटी म्हणजेच रोख घटल्याने आणि कर्जाची वाढती मागणी यामुळे देशातील ८ बँकांनी गेल्या एका महिन्यात एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. याचवेळी २०२४मध्ये पीएनबीसह चार बँकांनी कर्जे महाग केली आहेत.

नवी दिल्ली : बँकांमधील लिक्वीडिटी म्हणजेच रोख घटल्याने आणि कर्जाची वाढती मागणी यामुळे देशातील ८ बँकांनी गेल्या एका महिन्यात एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. याचवेळी २०२४मध्ये पीएनबीसह चार बँकांनी कर्जे महाग केली आहेत. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने सर्वाधिक ०.१०% ने वाढ केली आहे. चारही बँकांचे नवे दर १ जानेवारीपासून लागू झाले आहेत, तर एफडीचे दर १.१०% वरून १.२५% पर्यंत वाढले आहेत. शेतकऱ्यांना गुंतवणूक करायची असेल किंवा कर्ज काढायचे असेल तर व्याजदर माहित असणे आवश्यक आहे.

कोणत्या बँकेचे कर्ज झाले महाग?एस बँक १०.५%आयसीआयसीआय ९.१०%बँक ऑफ इंडिया ८.८०%पीएनबी ८.७०%

अधिक वाचा: शेतकऱ्यांनो कर्ज मिळणार की नाही, हे नेमके कशावरून ठरते?

एफडीवर किती मिळतेय व्याज?बँक ऑफ बडोदा ४.२५-७.२५%एसबीआय ३.५०-७.१०%बँक ऑफ इंडिया ५.२५-७.५०%युनियन बँक ३.०-७.२५%पीएनबी ३.५०-७.०%कोटक महिंदा २.७५-७.२५%फेडरल बँक ३.०-७.५०%डीसीबी बँक ३.७५-८.०%

कोणत्या बँकेने गृहकर्ज स्वस्त केले?बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जाच्या व्याजदरात ०.१५ टक्क्यांनी कपात करून ते ८.३५ टक्क्यांवर आणले आहेत.

कोणत्या बँकांनी वाढविला एफडीचा व्याजदर?एसबीआयबँकेने ७ ते ४५ दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदरात ०.५% वाढ केली आहे. ४६ ते १७९ दिवसांच्या एफडीवर व्याजदर ०.२५% वाढले आहेत. १८० ते २१० दिवसांच्या एफडीच्याव्याजदरात ०.२५% वाढ करण्यात आली आहे.बँक ऑफ इंडियाअल्प कालावधीसाठी एफडी दर वाढवले आहेत. ४६ ते ९० दिवसांच्या एफडीवर ५.२५%, ९१ ते १७९ दिवसांसाठी ६%, १८० ते २१० दिवसांसाठी ६.२५% आणि एका वर्षाच्या एफडीवर ७.२५% वार्षिक व्याज उपलब्ध आहे.कोटक महिंद्राबँकेने ३ ते ४ वर्षाच्या मुदतीच्या एफडीचे दर ०.५०% ने वाढवून ६.५% वरून ७% पर्यंत वाढवले आहेत. त्याच वेळी, बँकेने ४ ते ५ वर्षाच्या कालावधीच्या एफडीचे दर ०.७५ टक्क्यांनी वाढवून ७ टक्क्यांवर नेले आहेत.

टॅग्स :बँकस्टेट बँक आॅफ इंडियाबँक ऑफ इंडियापैसाशेतकरी