Join us

Umed Abhiyan : स्वकर्तृत्वातून सव्वालाख महिलांनी साधली उन्नती; शेतीपूरक व्यवसायात भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 10:31 IST

Umed Abhiyan: उमेदअंतर्गत (Umed Abhiyan) असलेल्या जालना जिल्ह्यातील बचत गटातील तब्बल एक लाख २१ हजार ४१२ महिलांनी विविध व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधली आहे. काही महिलांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू केले तर काहींनी लघुउद्योग सुरू केले आहेत. वाचा सविस्तर (self-employment)

Umed Abhiyan :  उमेदअंतर्गत  (Umed Abhiyan) असलेल्या जालना जिल्ह्यातील बचत गटातील तब्बल एक लाख २१ हजार ४१२ महिलांनी विविध व्यवसायातून आपली आर्थिक उन्नती साधली आहे. (self-employment)

त्यात सहा हजार ७४४ महिलांनीशेतीपूरक व्यवसाय सुरू केले आहेत. स्वतःची आर्थिक उन्नती साधत कुटुंबाला उभारी देणाऱ्या या महिलांचा सामाजिक स्तरही उंचावला आहे. (self-employment)

ग्रामीण भागातील दारिद्रय निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून व ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची (उमेद)  (Umed Abhiyan) सुरुवात केली.

जिल्ह्यात २०१२-१३ पासून हे अभियान राबविले जात आहे. ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित करून त्यांचा सामाजिक स्तर वाढविणे, त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. (Umed Abhiyan)

याअंतर्गत जिल्ह्यात १५ हजार २३४ स्वयंसहायता समूह स्थापन करण्यात आले आहेत. या गटांमध्ये एक लाख ४५ हजार ३०३ कुटुंबांचा सहभाग आहे.'उमेद' अंतर्गत कार्यरत या बचत गटांतील महिला शेतीपूरक व्यवसायातही उतरल्या आहेत.  (complementary businesses)

त्यातील ६७४४ महिलांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू केले आहेत. याद्वारे महिलांनी स्वतःची आर्थिक उन्नती साधत कुटुंबाच्या प्रगतीतही हातभार लावला आहे. या महिलांनी सुरू केलेल्या व्यवसायातून प्रेरणा घेत जिल्हाभरातील ग्रामीण भागातील इतर महिलाही स्वतः चे लहान उद्योग, व्यवसाय सुरू करीत आहेत. (complementary businesses)

पारध बुद्रुक येथील तक्ष महिलांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून या गटातील महिला सदस्य चांगली प्रगती साधत आहेत.(complementary businesses)

१२ महिलांची शेतकरी कंपनी

जिल्ह्यात १२ महिला शेतकरी कंपन्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचाही लाभ महिलांना होत आहे.

८६४ ग्रामसंघांची स्थापना

जिल्ह्यात ८६४ ग्रामसंघ स्थापन करण्यात आले असून, ५६ प्रभाग संघ स्थापन करण्यात आले आहेत. आजवर १४ हजार ९५६ गटांना ४४८८.८० लाखांचा फिरता निधी वाटप करण्यात आला आहे. चार हजार ८८२ गटांना १८० कोटी ३० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

३६७ उत्पादक संघ

उमेद अंतर्गत जिल्ह्यात ३६७ उत्पादक संघ स्थापन करण्यात आले आहेत. या उत्पादक संघांना ५२४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. या उत्पादक संघाकडून उत्पादित होणाऱ्या मालाला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्येही मोठी मागणी आहे.

'उमेद' अंतर्गत आमचा बचत गट असून, मी कुक्कुटपालन सुरू केले आहे. त्याद्वारे मला आर्थिक उत्पन्न मिळत आहे. इतर लहान व्यवसायाही आम्ही महिलांनी सुरू केले आहेत. - संगीता लोखंडे, पारध बुद्रुक

 बचत गटामार्फत मिरची रोपवाटिका सुरू केली आहे. त्याद्वारे मला उत्पन्न मिळत आहे. शिवाय इतर महिलांचीही आर्थिक उन्नती होत आहे.- सुनीता पवार, दानापूर

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 'उमेद' अंतर्गत बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतीपूरक व्यवसायांतूनही महिलांनी आथिक उन्नती साधली आहे. शिवाय इतर महिलांनीही लहान-लहान व्यवसाय सुरू केले आहेत. - शैलेश चौधरी, अभियान व्यवस्थापक

हे ही वाचा सविस्तर : Umed: बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरणावर भर; वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमहिलाजालना